अंतराळात गायब झालेलं 46 वर्ष जुनं Spacecraft एलियन्सना सापडलं? सिग्नल मिळाला, NASA ला संदेश पाठवला
दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या एका माजी गुप्तचर अधिका-यानं एलियन्सबाबत अत्यंत खबळजनक दावा केला होता. त्यानंतर आता अंतराळात गायब झालेलं 46 वर्ष जुनं Spacecraft एलियन्सना सापडल्याचा दावा केला जात आहे.
Voyager 2 News: अमेरिकन स्पेस एजन्सी नासाचा व्हॉयेजर-2 हा 46 वर्ष जुना Spacecraft अंतराळात अचानक गायब झाल्याच्या वृत्त समोर आले होते. आता हे Spacecraft एलियन्सना सापडल्याचा दावा केला जात आहे. या Spacecraft कडून सिग्नल मिळत असून एलियन्सकडून NASA ला संदेश पाठवले जात असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
काय झालंय नेमक?
अमेरिकन स्पेस एजन्सी व्हॉयेजर-2 Spacecraft हा पृथ्वीपासून 19 अब्ज KM अंतरावर असताना संपर्काबाहेर गेला. अचानक Spacecraft नासाच्या रडावरुन गायब झाला. मात्र, हा Spacecraft अजून कार्यरत असून अंतराळात याचे आवाज येत आहे. या आवाजाच्या दिशेनं NASA याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान हा Spacecraft एलियन्सना सापडले असून हे आवाज एलियन्सकडून मिळणारे संदेश असल्याचा दावा केला जात आहे.
वैज्ञानिकांच्या चुकीमुळे व्हॉयेजर-2 Spacecraft गायब झाला
अंतराळात भ्रमण करत असलेले व्हॉयेजर-2 Spacecraft हे नासाचे वैज्ञानिक मागील 46 वर्षांपासून पृथ्वीवरु ऑपरेट करत आहेत. वैज्ञानिकांकडून व्हॉयेजर-2 Spacecraft चुकीची कमांड देण्यात आली. यामुळे Spacecraft चा एंटीना फिरला आणि ते NASA च्या संपर्काबाहेर गेले. परिणामी व्हॉयेजर-2 पृथ्वीपासून 19.9 अब्ज किलोमीटर अंतरावर अंतराळातील अंधारात फिरत आहे.
गायब झालेल्या व्हॉयेजर-2 Spacecraft सिग्नल मिळाले
1977 मध्ये नासाने व्हॉयेजर-2 प्रक्षेपित केले होते. तब्बल 46 वर्षांपासून हे Spacecraft कार्यरत आहे. व्हॉयेजर-2 त्याच्या प्रक्षेपणानंतर अवघ्या दोन वर्षांत ते गुरू ग्रहाच्या कक्षेत पोहचले. त्यानंतर 1981 मध्ये शनि, 1986 मध्ये युरेनस आणि 1989 मध्ये नेपच्यून ग्रहाचे या Spacecraft परिक्षण केले. सूर्यमाला पार करुन हे खोल व्हॉयेजर-2 Spacecraft अंतराळात पोहोचले आहे. व्हॉयेजर-2 Spacecraft विविध ग्रहांचा अभ्यास करत आहे. यापूर्वी देखील व्हॉयेजर-2 Spacecraft नासाच्या रडारवरुन गायब झाले होते. मात्र, पुन्हा ते NASA च्या संपर्कात आले होते. आता पुन्हा एकदा मागील दोन आठवड्यांपासून व्हॉयेजर-2 Spacecraft नासाच्या रडारवरुन गायब झाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथील 'डीप स्पेस नेटवर्क'ला (DSN) व्हॉयेजर-2 Spacecraft कडून काही सिग्न मिळाले आहेत. हे सिग्न एलियन्समार्फत पाठवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
अमेरिकेत एलियन्सचे मृतदेह
अमेरिकेत एलियन्सचे मृतदेह असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या माजी गुप्तचर अधिका-याने हा दावा केला आहे. सरकारकडे एलियन्स आणि परग्रहावरील इतर जीवांचे मृतदेह असल्याच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.