Video : पृथ्वी नव्हे, ब्लू मार्बल! NASA नं टीपला अवकाशातील आणखी एक अद्भूत नजारा

NASA Blue Marble Image: ब्लू मार्बल! अवकाशात कशी दिसते पृथ्वी? निळ्याशार ग्रहाची झलक पाहून थक्क व्हाल. घरबसल्या पाहा पृथ्वीची कधीही न पाहिलेली रुपं...
NASA Blue Marble Image: विविध अवकाश मोहिमांच्या माध्मयातून नासानं अर्थात अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेनं कायमच अवकाशाचं एक अनोखं विश्व मनुष्यापर्यंत सहजगत्या पोहोचवलं आहे. प्रचंड निरीक्षण, अभ्यास आणि तत्सम प्रयत्नांच्या बळावर नासा (NASA) च्या वतीनं या क्षेत्रात प्रगती करण्यात आली आहे. त्यातच आता आणखी एका प्रयत्नाची भर पडली असून, साऱ्या जगाला थक्क करणारी दृश्य नासानं समोर आणली आहेत.
NASA आणि Firefly Aerospace यांनी एकत्र येत चंद्राच्या दिशेनं एका मोहिमेअंतर्गत मोठं पाऊल टाकलं असून, Blue Ghost Lunar Lander मोहिमेची सुरुवात केली आहे. याच मोहमेअंतर्गत अद्भूत दृश्य टीपण्यात आलं असून, लँडरनं यशस्वीरित्या एक व्हिडीओसुद्धा चित्रीत केला आहे. या व्हिडीओमध्ये पृथ्वी हा एकमेव मानवी अस्तित्वं आणि जीवसृष्टी असणारा ग्रह दिसत असून, या ग्रहाची झलक जणू एका निळ्याशार संगमरवरासारखी दिसत आहे. याच कारणानं नासानं या व्हिडीओमधील दृश्यांना 'ब्लू मार्बल' असं संबोधलं आहे.
यापूर्वी 1972 मध्ये अवकाशातून पृथ्वीचं असंच विलोभनीय रुप पाहायला मिळालं होतं. नासाच्याच Apollo 17 मोहिमेदरम्यान मूळ स्वरुपातील 'ब्लू मार्बल'ची पहिली झलक अर्थात एक छायाचित्र टीपण्यात आलं होतं. 2002 मध्ये नासानं या फोटोचं अपडेटेड वर्जनही जारी केलं ज्याला 'Blue Marble: Next Generation' असं म्हटलं गेलं.
हेसुद्धा वाचा : घातक! पुढील 4 वर्षांत कोरोनासारखीच महामारी येणार; बिल गेट्स यांनी वाढवली जगाची चिंता
दरम्यान, सध्या टीपलेली झलक ही Blue Ghost चं श्रेय असून, या यानानं आपल्या प्रवासादरम्यान ही किमया केली आहे. ही झलक टीपण्यासाठी लँडरवर लावण्यात आलेल्या हाय टेक कॅमेरांचा वापर करण्यात आला होता. नासाच्या या मोहिमेविषयी सांगावं तर, Blue Ghost मोहिमेअंतर्गत नासा चंद्रावर उतरण्याची तयारी करत असून, या मोहिमेची आखणी Firefly Aerospace नं नासाच्या Commercial Lunar Payload Services (CLPS) कार्यक्रमाअंतर्गत केली आहे. चंद्राच्या पृष्ठापर्यंत नासाची 10 संशोधनं पोहोचवणं हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. चंद्रासंदर्भातील संधोनांमध्ये मानवी प्रयत्नांना या मोहिमेमुळं मोठा हातभार लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.