Meteor Shower Video:11 ऑगस्टच्या रात्री आकाशातून काहीतरी वस्तू खालच्या दिशेने आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. ही वस्तू काय आहे? हे अनेकांना सांगता येत नाही. काहीजण या पोस्टमध्ये एक्सपर्टना मेन्शन करत आहेत. दरम्यान काही काळ आधी अंतराळ एजन्सी नासाने यासंदर्भात अलर्ट जारी केला होता. काय आहे हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


उल्कापिंडाचा वर्षाव 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 ऑगस्ट रात्री 8 वाजून 12 मिनिटांनी आकाशातून चमकणारी वस्तू दिसली. जपानच्या माकुराजाकी शहरातील नागरिकांना हे दृश्य दिसले. ही वस्तू म्हणजे उल्कापिंड होते. याच्या चमकण्यामुळे लोक पाहत राहिले. नासाकडून शूटिंग स्टारसंदर्भात नागरिकांना आधीच माहिती देण्यात आली होती.2 ऑगस्ट रोजी नासाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन माहिती दिली होती. त्यानुसार, 11 ते 12 ऑगस्ट रोजी उल्का वर्षा होऊ शकते,असे म्हटले होते. अमेरिकेच्या काही भागात देखील उल्कापिंडाचा वर्षाव पाहायला मिळाला,असे सांगितले जात आहे. 


दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वात जास्त उल्कापिंड आकाशातून पडताना दिसले. तुम्ही जर काळ्याकुट्ट अंधारात असाल तर असे उल्कापिंड चांगल्या पद्धतीने पाहू शकालं,असे आवाहन नासाने केले आहे. साधारण 45 मिनिटे आधी अंधारात आलात तरच हा नजारा सुंदर पद्धतीने पाहाल,असेही त्यांनी म्हटले आहे. 


पाहा व्हिडीओ 



कारपेक्षा 500 पट वेग 


उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येताना अनेकजणांनी पाहिले असतील. दूर अंतर असल्याने आपल्याला याचा नेमका वेग किती असेल याचा अंदाज लावता येत नाही.जगातील वेगवान कारपेक्षाही 500 पट जास्त वेगाने हे उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येतात. यावरुन तुम्ही या वेगाचा अंदाज लावू शकता. उल्कापिंड कोसळणार आहे, हे माहिती असेल तर मोबाईलमध्ये दृश्य पाहत राहू नका. तुम्ही उघड्या डोळ्यांनी आकाशात खूप चांगल्या पद्धतीने हे दृश्य पाहू शकता. उल्कापिंडचा मानवाला कोणता धोका नाहीय. कारण साधारण 60 मैलावरच ते जळून भस्म होते. 


3 मोठे एस्टेरॉइड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असल्याची माहितीदेखील नासाने जारी केली होती. कालच्या रात्री ते पृथ्वी जवळून जाणार होते. पण काळजी करण्याचे कोणते कारण नाही. कारण 'जवळून' हे अंतर 38 लाख किमी इतके आहे. याने मानवाला कोणता धोका नाही. हे 30 हजार किमी प्रती तास वेगाने पुढे जात आहे. सर्वात मोठा एस्टेरॉइड साधारण 242 फूट रुंद आहे.