ख्रिसमसच्या एक दिवस आधी मोठा वैज्ञानिक चमत्कार! प्रचंड वेगाने सूर्याच्या जवळून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू
नासाच्या पार्कर सोलर प्रोब या यानाने नवा विक्रम रचला आहे. हे यान सूर्याच्या अगदी जवळून गेले आहे.
NASA Parker Solar Probe : वर्षाच्या शेवटी अमेरिकेची अंतराळ संस्था अर्थात NASA ने मोठा वैज्ञानिक चमत्कार केला आहे. NASA ने हाती घेतलेल्या सूर्ययान मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी नासाने पार्कर सोलर प्रोब नावाचे यान लाँच केले आहे. NASA च्या सूर्ययानानं आपला आधीचा रेकॉर्ड मोडून नवा विक्रम रचला आहेत. प्रचंड वेगाने हे सूर्ययान सूर्याच्या अगदी जवळून गेले आहे. हे यानाने सूर्यापासून फक्त 61 लाख किलोमीटर अंतरावरुन उड्डाण केले.
याआधी 27 सप्टेंबर 2023 रोजी हे यान पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या पृष्ठभागापासून केवळ 72. 60 लाख किलोमीटर अंतरावर आले. यानंतर आता 24 डिसेंबर 2024 रोजी हे यान यूएस इस्टर्न टाइमनुसार सकाळी 6:53 वाजता तर भारतीय वेळेनुसार 5:23 वाजता हे यान सूर्याच्या पृष्ठभागाच्या सर्वात जवळून गेले. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला कोरोनाच्या तीव्र उष्णतेचा सामना करत या यानाने आधीचा रेकॉर्ड मोडला. हे यान सूर्याच्या अगदी जवळ म्हणजेच फक्त 61 लाख किलोमीटर अंतरावर पोहचले. पार्कर सोलर प्रोब हे यान 6.35 लाख किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने प्रवास करत आहे.
सौर लहरी किंवा सीएमई कधीकधी इतके शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार करतात की ते अब्जावधी टन प्लाझ्मा सोडतात. यातील अनेक सौरलहरी या 96.56 ते 3057.75 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने प्लाझ्मा सोडतात. या वादळांच्या गतीला मागे टाकत हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून फक्त 61 लाख किलोमीटर अंतरावर पोहचणारे पहिली मानव निर्मीत वस्तू ठरली आहे.
पार्कर सोलर प्रोब हे यान सूर्याची अनेर रहस्य उलगडणार आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6000 अंश सेल्सिअस इतके आहे. सूर्याचा कोरोना लाखो अंशांपर्यंत पोहोचतो. 2018 मध्ये लाँच झालेल्या पार्कर प्रोबने यापूर्वीच 21 सोलर फ्लायबाय पूर्ण केले आहेत. प्रत्येक वेळी आपने जुने रेकॉर्ड मोडत हे यान सूर्याच्या जवळ जात आहे.