NASA Shares a video : अंतराळ क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि महत्त्वाची संशोधनं करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नासा (NASA) कडून एक नवा व्हिडीओ नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. X च्या माध्यमातून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स (Sunita Williams) आणि त्यांच्या सहकारी अंतराळवीरांपुढं उभ्या राहिलेल्या आव्हानांची माहिती देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विलियम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतराळात स्पेस वॉक करण्याचं ठरवलेलं असतानाच उदभवलेल्या एका अडचणीमुळं त्यांना ही मोहिम आयत्या वेळी रद्द करावी लागली. अंतराळवीर Tracy C. Dysonच्या स्पेससूटमधील कूलिंग अम्बिलिकल युनिटमधून पाणीगळती सुरू झाल्यामुळं ही मोहिम रज्ज करण्यात आली. यावेळी या टीमनं थेट अवकाळातूनच LIVE दृश्यही जगासमोर आणली. 


दरम्यान, सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी गेल्या काही दिवसांपासून एका मोठ्या अडचणीमुळं चर्चेचा विषय ठरले आहेत. 5 जून रोजी अवकाशवारीवर गेलेल्या विलियम्स 13 जून रोजी अवकाशातून पृथ्वीवर परतणं अपेक्षित होतं. पण, त्या अद्याप पृथ्वीवर पोहोचू शकल्या नाहीत. विल्यम्स यांच्या बोईंग स्टारलायनरमध्ये हेलियम लीक झाल्यामुळं त्यांच्या परतीच्या प्रवासात व्यत्यत येत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, ही मोहिम सुरु होण्याआधीच NASA आणि बोईंगना यासंदर्भातील कल्पना असल्याचं सांगितलं जात आहे. पण, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या गोष्टीकडे किरकोळ बिघाड म्हणून पाहिल्यानं आता ही अडचण ओढावल्याचं सांगितलं जात आहे. 


अवघ्या 27 दिवसांचं इंधन शिल्लक? 


बोईंगच्या स्टारलायनर प्रोग्राम मॅनेजर मार्क नप्पी यांच्या माहितीनुसार स्पेसक्राफ्टमधील हेलियम प्रणाली ज्या पद्धतीनं तयार करण्यात आली होती ती अपेक्षितरित्या काम करत नाहीय. परिणामी सध्याच्या घडीला विलियम्स आणि त्यांच्यासमवेत असणाऱ्या अंतराळयात्रींना सुखरुप पृथ्वीवर परत आणण्यासाठीच नासाचे प्रयत्न सुरु आहेत. 


हेसुद्धा वाचा : व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो 'राम सेतू'... समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती 



दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार स्टारलायनरची इंधनक्षमता 45 दिवसांची असून, ही मोहिम साधारण 18 दिवसांपूर्वी सुरू झाली होती. आता या मोहिमेत 26-27 दिवसच शिल्लकत असल्यामुळं बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांच्या परतीच्या प्रयत्नांना आणखी वेग मिळाला आहे. सर्व अडचणी दूर झाल्यानंतर जेव्हा स्पेसक्राफ्ट पृथ्वीवर परतण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण केली जाईल, तेव्हाच हे अंतराळवीर पृथ्वीवर परतू शकणार आहेत.