मुंबई : अंतराळात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी एक चांगली संधी आहे. नासाने एक चांगली कल्पना पर्यटकांसाठी शोधली आहे. नासा ही संस्था एक खास सुविधा पर्यटकांसाठी घेवून येत आहे. या योजनेनुसार नासा अंतराळात पर्यटकांना जाण्याची संधी देणार आहे. यामुळे सामान्यांना देखील अंतराळात जाणे शक्य होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नासा अंतराळ पर्यटनासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र (आयएसएस) मध्ये जाण्याची परवानगी मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहे. नासाने शुक्रवारी ७ जूनला घोषणा केली होती की, २०२० पर्यत अंतराळात पर्यटनासाठी आणि व्यावसायिक योजनेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन स्थापन करणार आहे. पण यासाठी पर्यटकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.


अंतराळात एक रात्र घालविण्यासाठी पर्यटकांना ३५००० अमेरिकी डॉलर मोजावे लागतील. नासाने व्यावसायिक दृष्टीने काम सुरु केले आहे. नासाच्या या योजनेमुळे इतर व्यक्तींना देखील अंतराळात जाता येणार आहे. या अंतराळ केंद्रात तीस दिवस राहता येणार आहे. नासा संस्थेने हा पर्यटनाचा हा वेगळा विचार मांडला आहे.


एका प्रवाशामागे ५० कोटी डॉलर खर्च होणार असल्याचा अंदाज न्यूयार्कच्या एका नासाच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्याचा वर्तवला आहे. या पर्यटकांची जबाबदारी स्पेस एक्स आणि बोइंग कंपनी घेणार असून नासा अंतराळात पर्यटकांना जाण्याची व्यवस्था करणार आहे. या बदल्यात पर्यटकांना ३५ हजार डॉलर प्रति रात्र द्यावे लागतील. सोबतच नासाने म्हटलं आहे की, प्रति वर्षांत १२ पेक्षा अधिक पर्यटक अंतराळात जाऊ शकणार आहेत.


या पर्यटकांना नासाच्या परिवहन वाहनाने नेलं जाणार आहे. स्पेस एक्ससाठी क्रू डॅगन कॅप्सूल आणि बोइंग बरोबर चर्चा सुरु आहे. याआधी अमेरिकेतील व्यवसायिक 'डेनिस टीटो' २००१ मध्ये अंतराळात पर्यटनासाठी गेले होते. १८ पूर्वी त्यांनी यासाठी २० मिलियन अमेरिकन डॉलर मोजले होते.