नासाने रचला मोठा इतिहास...
मंगळाच्या जमिनीवर उतरवला `मार्स इनसाइट`
मुंबई : सात महिन्याच्या सततच्या प्रवासानंतर नासाच 'मार्स इनसाइट' सोमवारी लाल ग्रहाच्या जमिनीवर यशस्वीरित्या उतरलं. भारतीय वेळेनुसार सोमवारी मध्यरात्री 1.30 वाजल्यानंतर इनसाइटने मंगळवार उतरल्याचे नासाच्या कंट्रोल रूमला सिग्नल दिला. आम्ही योग्यप्रकारे मंगळावर उतरलो.
इनसाइट पहिल्यांदा मंगळ ग्रहावरील सुदूर परिसरात भूमिगत संरचनेचं अध्ययन करणार आहेत. तसेच भूकंपाच्या गतीची देखील याद्वारे नोंद केली जाणार आहे. इनसाइटला याचवर्षी 5 मे रोजी प्रक्षेपित करण्यात आलं. 62000 मील प्रति तासाच्या गतीने इनसाइटने 301,223,981 मील प्रवास केला आहे.
इनसाइट मंगळावर उतरण्यासाठी 7 मिनिटांचा कालावधी लागला. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी मंगळावर उतरले. सात मिनिटांपर्यंत जगातील सगळे वैज्ञानिक या प्रक्रियेला लाइव पाहत होते. इनसाइट ज्यावेळी मंगळावर यशस्वीरित्या उतरले तेव्हा सर्व वैज्ञानिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि आनंदाने नाचू लागले.
नासाचे जिम ब्राइडेंस्टाइन यांनी इनसाइटच्या टचडाऊनची घोषणा केली आणि सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. नासाच्या या इनसाइटचं लँडिंग लाइव दाखवण्यात आलं. या मिशनकरता जवळपास 7044 करोड रुपये खर्च आला.
इनसाइटला मंगळावर उतरवण्यासाठी याचवर्षी 5 मे रोजी नासाच्या कॅलिफोर्नियाच्या वंडेनबर्ग एअरफोर्स स्टेशनवरून एटलस वी रॉकेटमार्फत लाँच करण्यात आलं. या अगोदर 2012 मध्ये मंगळावर पहिलं यान क्यूरोसिटी पाठवण्यात आलं.