मास्को : Russia Ukraine Conflict : रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्याने अनेक राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. या युद्धानंतर संपूर्ण जगाला रशियाला कसे रोखायचे याबाबत चिंता आहे. दरम्यान, अणूयुध्दायचे सावट असेल, अशीही भीती व्यक्त होत आहे. तर नाटोने रशियाला युद्ध थांबवा, असे सांगता कडक निर्बंधासाठी तयार राहा, असा स्पष्ट इशारा दिला आहे. (NATO warns Russia to impose tougher sanctions after war) मात्र, रशियाने जगाचा दबाव झुगारुन युक्रेनला शस्त्र खाली ठेवा आणि शरण या, असे बजावले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे 'तुम्ही एकटे नाही, असे सांगत संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत युक्रेनला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अनेक देशांनी रशियाने पुकारलेल्या युद्धाविरोधात आवाज उठवला आहे. अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. युरोपमध्ये हे युद्ध होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यामध्य मध्यस्थीची विनंती केली आहे.  



रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अखेर युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर तात्काळ हल्ला चढविण्यात आला. युक्रेनवर जोरदार हल्ले सुरु आहेत. गुरुवारी सकाळीच पुतीन यांनी पूर्व युक्रेनमध्ये लष्करी कारवाईचा आपला मनसुबा उघडपणे व्यक्त केला आणि हे हल्ले सुरु झालेत. रशियन सैन्य आता क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये दाखल होत आहे. या परिस्थितीत युक्रेनने जगाकडे रशियाला रोखण्यासाठी मदतीची मागणी केली आहे.


पुतीन यांनी युक्रेनच्या मित्रराष्ट्रांनाही धमकी वजा इशारा दिला आहे. रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. यापूर्वी कधीही पाहिलेले नाही, अशा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, अशी धमकी त्यांनी पाश्चिमात्य आणि युक्रेनच्या मित्रदेशांना दिली आहे.