ईमेलमध्ये इमोजीचा वापर ठरतो निगेटीव्ह इमेजचे कारण
इमेल पाठवत असताना तुम्ही जर इमोजीचा वापर करत असाल तर सावधान! हे इमोजी तुमची इमेज निगेटीव्ह ठरवण्यास कारणीभूत होऊ शकतात. त्यामुळे इमेल पाठवताना काळजी घ्या.
मुंबई : इमेल पाठवत असताना तुम्ही जर इमोजीचा वापर करत असाल तर सावधान! हे इमोजी तुमची इमेज निगेटीव्ह ठरवण्यास कारणीभूत होऊ शकतात. त्यामुळे इमेल पाठवताना काळजी घ्या.
आपले सहकारी, वरिष्ठ किंवा कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला ईमेल पाठवणे ही अगदी कॉमन बाब झाली आहे. मात्र, अपल्यापैकी अनेकजन सवईने म्हणा किंवा वेगळेपणा दाखवायचा म्हणून म्हाणा ईमेलमध्ये मजकूर लिहीताना इमोजीचा वापर करतात. ही सवय तुमच्यासाठी खातक ठरू शकते असे एका अभ्यासात पूढे आले आहे.
इस्त्राईलमधील बेन गुरियन युनिवर्सीटी ऑफ निगेव्ह मध्ये शिकत असलेल्या एका अभ्यासक विद्यार्थ्याने याबाबत संशोधन केले आहे. इला ग्लिक्सन असे या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याने दावा केला आहे की, आम्ही केलेल्या संशोधनाचा प्राथमिक निष्कर्ष असा आहे की, ईमेलमध्ये इमोजीचा वापर केल्यास समोरच्याच्या मनात तुमची प्रतिमा नकारात्मक (निगेटीव्ह इमेज) होते. औपचारीक मेलमध्ये हास्याची जागा इमोजी घेऊ शकत नाही, असेही ग्लिक्सनने म्हटले आहे.
दरम्यान, ग्लिक्सनने केलेल्या या संशोधनात सुमारे २९ देशातील ५४९ लोकांनी सहभाग घेतला. या संशोधनाबाबतचा अहवाल 'सोशल सायकॉलॉजी एण्ड पर्सनालिटी सायन्स' मध्ये प्रकाशीत झाला आहे.