नवी दिल्ली : आज जगातील 200 हून अधिक देश कोरोना विषाणूच्या चक्रव्युहात अडकले आहेत. भारतातही अलीकडच्या काळात संक्रमित लोकांची संख्या खूप वेगाने वाढली आहे. असे असूनही भारत शेजारच्या देशांना मदत करीत आहे. नेपाळमध्ये अलीकडेच सुमारे 23 टन अत्यावश्यक औषधे भारताने पाठविली आहेत. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी लिहिले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभारी आहे की त्यांनी नेपाळला कोरोना साथीविरुद्ध लढण्यासाठी 23 टन आवश्यक औषधे दिली आहेत. आज भारतीय राजदूतांनी आमच्या आरोग्यमंत्र्यांनाही औषधे दिली.



पंतप्रधान मोदींनी त्यावर एक ट्विटही केले. त्यांनी लिहिले की, 'भारत आणि नेपाळमधील संबंध खूप खास आहेत. हे नाते केवळ मजबूत नाही तर त्याची मुळं खोलवर आहेत. या आपत्तीच्या वेळी भारत नेपाळच्या पाठिशी उभा आहे.


भारताने आतापर्यंत अनेक देशांना औषधं पाठवली आहे. भारत या कोरोना संकटाच्या काळात जगाचं नेतृत्व करण्याच्या भूमिकेत आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: अनेक देशाच्या प्रमुखांना फोन करुन त्यांची परिस्थिती जाणून घेतली आणि मदतीचं आश्वासन दिलं.


अमेरिकेला मदत पाठवल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, 'कठीण परिस्थितीत मित्राकडून अधिकाधिक सहकार्याची आवश्यकता आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन विषयी निर्णय घेतल्याबद्दल भारत आणि भारतीय लोकांचे आभार. हे आम्ही कधीही विसरू शकत नाही. या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार.'