नवी दिल्ली : मागील दोन वर्षांपासून माऊंट एव्हरेस्ट Mount Everest या जगातील सर्वाधिक उंचीच्या समजल्या जाणाऱ्या पर्वतशिखराची उंची नेमकी किती याबद्दल बरीच मतमतांतरं झाल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2015 मध्ये आलेल्या भयावह भुकंपानंतर या भागातील पर्तरांगांच्या भूभागामध्ये मोठे बदल झाले होते. त्याच धर्तीवर माऊंट एव्हरेस्टची उंची कमी झाल्याचंही म्हटलं गेलं. परिणामी भुकंपानंतर या उंचीवर काही परिणाम झाले आहेत का, याच्या परिक्षणासाठी पुन्हा एकदा ही उंची मोजण्यात येणार आहे. 


वर्षभरापासून आकडेवारीचा अभ्यास... 


हाती आलेल्या माहितीनुसार 2015 मध्ये आलेल्या भुकंपानंतर जवळपास एक वर्षाच्या आकडेवारीच्या आधारे, Mount Everestची नवी उंची मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. 


नेपाळच्या सर्वेक्षण विभागानं माध्यम आणि पत्रकारांना एका खास कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. ज्यामध्ये (Mount Everest) च्या नव्या उंचीची घोषणा करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी सदर आकडेवारीत सहभागी असणाऱ्या व्यक्तींना सन्मानितही करण्यात येणार आहे.


 



माऊंट एव्हरेस्टची उंची 8848 मीटर... 


नेपाळ सरकारच्या माहितीनुसार 2015 मधील भुकंपासह इतरही कारणांनी (Mount Everest) च्या उंचीमध्ये बदल होऊ शकतो. सर्व्हे ऑफ इंडियानं 1954 नं काढलेल्या आकडेवारीनुसार (Mount Everest) ची उंची 8848 मीटर इतकी आहे. 


1975 मध्ये चीनच्या अभ्यासकांनी या पर्वताची उंची मोजली होती. त्यावेळी ही उंची 8848.13 मीटर इतकी असल्याची माहिती समोर आली.  हे पर्वतीय टोक सागरमाथा या नेपाळी नावानंही ओळखलं जातं.