नेपाळ : जगातल्या सर्वोच्च पर्वत शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टची, एका नेपाळच्या गिर्यारोहकाने 26 व्या वेळा चढाई करत विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. शेरपा कामी रीता असे 52 वर्षीय या गिर्यारोहकाचे नाव आहे. विशेष म्हणजे गिर्यारोहक शेरपा कामी रीता याने 26 व्या वेळा यशस्वी चढाई करत स्वत:चाच जुना रेकॉर्ड मोडीत काढला आहे. जगभरातला सर्वोच्च शिखर व वय पन्नाशी पुढे असताना देखील खडतर अशी मोहीम फतेह केल्याने शेरपा कामी रीता यांच्यावर सर्वच स्तरावरून कौतूक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळचे गिर्यारोहक कामी रीता शेरपा यांनी 26 साव्या वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करत विश्वविक्रमी कामगिरी केली. कामी रीता शेरपा यांच्यासोबत इतर 10 गिर्यारोहकही होते. या सगळ्या गिर्यारोहकांसोबत शेरपा यांनी चढाई करत विश्वविक्रम केला. तुम्हाला जर माहित नसेल तर 8,848.86 मीटर इतकी या पर्वताची उंची आहे. इतकी उंची 26 साव्या वेळा पुर्ण करणे तितकसं सोप्पे नव्हे. तेही पन्नाशीच्या पल्ल्याआड असलेल्या व्यक्तीला. शेरपा यांची ही कामगिरी तरूणांसाठी प्रेरणादायक आहे.  


काठमांडूचे पर्यटन विभागाचे महानिर्देशक तारानाथ अधिकारी यांनी या कामगिरीवर सांगितले, कामी रीता शेरपा यांनी स्वत:चाच जूना रेकॉर्ड मोडीत काढत नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केल्याचे अधिकारी यांनी सांगितले. कामी रीता शेरपा यांनी पतीच्या या कामगिरीवर खुश असल्याची प्रतिक्रिया दिली. 


दरम्यान वयाची पन्नाशी ओलांडूनही कामी रीता शेरपा यांची ही कामगिरी तरूणाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. कारण आजही अनेत तरून तंदुरूस्त राहण्यासाठी सकाळी उठून व्यायाम करत नाही. त्यामुळे व्यायामाचा कंटाळा करणाऱ्या तरूणांसाठी कामी रीता शेरपा यांची ही कामगिरी प्रेरणादायी आहे.