नव्या कोरोना व्हायरसची भीती, या देशाने इंग्लंडमधून येणाऱ्या विमानांवर घातली बंदी
एकीकडे लसीकरणाची तयारी होत असताना कोरोनाच्या दुसऱ्या व्हायरसची भीती
लंडन : इंग्लंडच्या दक्षिण-पूर्व भागात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आला आहे. यामुळे देशात भीतीचे वातावरण आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, दक्षिण इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार उघडकीस आल्यानंतर नेदरलँड्सने या वर्षाच्या शेवटपर्यंत युकेकडून येणारी विमानांवर बंदी घातली आहे.
कोरोना रूग्णांमध्ये अलीकडेच एक नवीन प्रकारचा व्हायरस समोर आला आहे. ब्रिटीश शास्त्रज्ञांनी या नवीन प्रकारच्या व्हायरसला 'व्हीयूआय 202012/01' नाव दिले आहे. नेदरलँड्सने ब्रिटनहून येणार्या विमानांवर बंदी घातली आहे जेणेकरून त्याचा प्रचार त्यांच्या देशात होऊ नये. वृत्तसंस्था एपीने दिलेल्या वृत्तानुसार, नेदरलँड्सने घातलेली ही बंदी रविवारी सकाळपासूनच लागू झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे नेदरलँड्स सरकारने म्हटले आहे.
ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी शनिवारी लंडन आणि आसपासच्या भागात कडक निर्बंध जाहीर केल्याची माहिती आहे. यूकेमध्ये लसीकरण मोहिम सुरु आहे. पीएम जॉनसन म्हणतात की, कोविड लस यावर किती परिणामकारक असेल, किती किंवा किती प्राणघातक आहे याचा पुरावा नाही. नेदरलँड्सचे म्हणणे आहे की, या विषाणूचे नवीन रूप ब्रिटनमधून रोखण्यासाठी ते युरोपियन युनियनच्या इतर देशांशी चर्चा करतील.'
'जगामध्ये कोरोना विषाणूचं एक नवीन रूप समोर आले आहे जे आधीच्या व्हायरसपेक्षा 70 टक्के वेगाने पसरते. असं जॉनसन यांनी आधी म्हटलं होतं. लंडन आणि दक्षिण इंग्लंडमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरण्याची शक्यता आहे.