नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हाईट हाऊस भेट चर्चेचा विषय असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांनी मोदींचं स्वागत केले. आता नेदरलँड राष्ट्राध्यक्षांनी ट्विट करत मोदींचे हिंदीतून स्वागत केले. दरम्यान, मोदी यांनी हिंदीतून संवाद साधन अनिवासी भारतीयांची मने जिंकली. त्यांनी मोदी मोदी अशी घोषणा दिल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींचे खास भारतीय पद्धतीने नेदरलँडमध्ये स्वागत करण्यात आले. नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडचे राष्ट्राध्यक्ष मार्क रूट यांनी चक्क हिंदीत स्वागत केलेय. यासाठी मार्क यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून हिंदी भाषेत ट्विट करत भारतीयांची मने जिंकली.


नेदरलैंड्स में आपका स्वागत है @narendramodi भारत और नेदेरलैंड्स के 70 साल के द्विपक्षीय रिश्तेके साथ मै हमारी बैठक के लिए बहुत उत्सुक हूं, असे  ट्विट मार्क यांनी हिंदी भाषेत केले आहे.


हिंदीत ट्विट करण्याची मार्क यांची ही काही पहिलीच वेळ नाही, २०१५ मध्ये मार्क जेव्हा भारतात आले होते तेव्हा देखील भारताचे कौतुक करताना त्यांनी हिंदीत ट्विट केले होते.