मुंबई : तुम्ही लोकांना असं बोलताना ऐकलं असेल की, आगीपासून आणि पाण्यापासून कधीही खेळू नये. यासंदर्भात लोक आपले वेगवेगळे अनुभव देखील सांगतात. परंतु हे नक्की काय? आणि हे असं का बोललं जातं, हे तुम्हाला व्हिडीओ पाहून लक्षात येईल. एक छोटीशी ठिणगी कशी काय धोकादायक ठरु शकते, हे तुम्हाला या व्हिडीओच्या माध्यमातून लक्षात येईलच. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका जंगलातील आहे, जेथे एक व्यक्ती लाकडांना गोळा करुन आग लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी तो लाकडाच्या ढिगावर इंधन देखील टाकतो आणि मग खाली उतरुन एका कागदाच्या तुकड्याला आग लावतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु त्या क्षणाला जे घडतं, ते पाहुन तुमच्या अंगावर काटा उभा राहिल.


खरंतर हा व्यक्ती आग लावताना अचानक एक मोठा स्फोट होतो. त्यानंतर पुढे काहीही दिसत नाही.



या आगीमुळे त्या व्यक्तीचे किती नुकसान झाले हे कळू शकलं नाही. परंतु ज्या पद्धतीने स्फोट झाला ते पाहता तो व्यक्ती गंभीर जखमी झाला असावा असा अंदाज बांधला जात आहे.


हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर The Darwin Awards नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. 34 सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर हजारो लोकांनी व्हिडीओला लाईक केलं आहे.