मुंबई : मद्यपान करणाऱ्या लोकांना बीयर आवडते. त्याच बरोबर काही लोकं बीअरला औषध म्हणून देखील काही प्रमाणात पितात. त्यात अनेक लोकंना चिल्ड बीयर पिण्यासाठी फार आवडते. परंतु जर मद्यपान करणार्‍यांना असे सांगण्यात आले की, ही बीअर मानवी मूत्रापातून तयार केली गेली असेल, तर कदाचित बीयर पिणारे लोकं ती कधीही पिणार नाही. पण होय हे अगदी खरे आहे. पिझनर कंपनी मानवी मूत्रापासून बिअर बनवते. ही एक नवीन संकल्पना आहे, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती देखील नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्याकडे जर पिझनर बीअर असेल तर याचा अर्थ असा कि, तुम्ही चक्कं मानवी मूत्राला तोंड लावत आहात. Pisnerच्या नावात Pis आहे, Pis म्हणजे मूत्र. एका अहवालानुसार, काही वर्षांपूर्वी या कंपनीने एका संगीत कार्यक्रमातून 50 हजार लिटर मानवी मूत्र गोळा केले होते, त्यानंतरच त्यांनी त्यांची बीअर बनवण्याची सुरूवात केली.



कंपनीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी आपली बीअर लाँच केली, तेव्हा लोकांना वाटले की, कंपनी थेट लोकांच्या लघवीला बिअर म्हणून विकत आहे. पण तसे नाही. कंपनीने सांगितले की, "आमच्या उत्पादनांमध्ये आम्ही मानवी मूत्र वापरते हे खरे आहे, परंतु ते संपूर्ण प्रक्रियेतून जाते. ज्यामुळे तुम्हाला मानवी मुत्राची चव येणार नाही. जर असे झाले तर, आम्ही हे उत्पादन बंद करु. पण तुम्हाला याची जराही चव नाही लागणार हा मात्र नक्की"



डेन्मार्कचे कृषी आणि अन्न मंत्रालयातुन सांगण्यात आले की, "मानवी कचरा मोठ्या प्रमाणात खत म्हणून वापरणे ही नवीन संकल्पना आहे. याला “beercycling” म्हणतात.


यामुळे पुढच्या वेळी पार्टीमध्ये काळजीपूर्वक बीअर प्या. कारण तुम्ही ज्या गोष्टीचा आनंद घेत आहात ती एखाद्याची लघवी असू शकते.