Plane flies 13 hours only to land back on same airport: सध्या विमानप्रवासासंदर्भातील अनेक चित्रविचित्र बातम्या समोर येत आहेत. कधी प्रवाशांनी घातलेला गोंधळ तर कधी विमान कंपन्यांनी घातलेला गोंधळ बातमीचा विषय ठरते. अशाच विचित्र बातम्यांच्या यादीत आणखीन एका घटनेची भर पडली आहे. विचार करा की तुम्ही 13 तास विमानाने प्रवास करताय आणि विमान लॅण्ड झालं तेव्हा तुम्ही जिथू निघाला होता त्याच विमानतळावर आहात, असं समजलं तर? तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल की नाही? हे कसं झालं इथपासून ते विमान कंपनीची अक्कल काढण्यापर्यंतच्या भाषेत तुम्ही आपला संताप व्यक्त कराल यात शंका नाही. असाच काहीसा प्रकार खरोखरच एका विमानातील प्रवाशांबरोबर घडला.


घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा संपूर्ण प्रकार दुबईहून न्यूझीलंडला (New Zealand bound Dubai Plane) जाणाऱ्या एमिरीट्स (Emirates) एअरवेजच्या विमानासंदर्भात घडला. 'फॉक्स न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार 13 तासांहून अधिक वेळ उड्डाण केल्यानंतर विमान एका विचित्र घटनेमुळे त्याच विमातळावर उतरलं जिथून त्याने उड्डाण केलं होतं. फ्लाइट क्रमांक ईके 448 ने स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास उड्डाण केलं. 'फ्लाइटअवेयर'च्या वृत्तानुसार वैमानिकाने जवळजवळ 9 हजार मैल (अंदाजे 1500 किलोमीटर) प्रवास केला. त्यानंतर अर्ध्या रस्त्यावर पोहचल्यानंतर अचानक विमानाने यू-टर्न घेतला. विमान अखेर शुक्रवारी आणि शनिवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास दुबईमध्ये उतरलं.


पण यू-टर्न घेतला का?


आता 13 तासांच्या फ्लाइटनंतर अचानक वैमानिकाने यू-टर्न का घेतला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात आलेला पूर (Auckland floods). ऑकलंडमध्ये (Auckland) निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे विकेण्डला या शहरातील विमानतळं (Auckland Airport) अचानक बंद करण्यात आली. शहरातील विमानतळांवरुन एकही विमान उड्डाण करणार नाही किंवा लॅण्ड करणार नाही अशी घोषणा करण्यात आली. ऑकलंड विमानतळावरील अधिकाऱ्यांनी ट्विटरवरुन, "हे फारज निराशजनक आहे. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय गेण्यात आला आहे. ऑकलंड विमामतळावरील आंतरराष्ट्रीय धावपट्टीला नुकसान झालं आहे. त्याचाच आढावा घेतला जात आहे आणि दुर्देवाने हे काम पूर्ण होईपर्यंत कोणतेही आंतरराष्ट्रीय उड्डाण या ठिकाणाहून होणार नाही. हे फार खेदजनक असलं तरी प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे," असं म्हटलं होतं.



विक्रमी पाऊस


बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, ऑकलंडमध्ये शुक्रवारी सर्वाधिक पाऊस झाला. यापूर्वीचे अनेक विक्रम या पावसाने मोडीत काढले. या पावसामुळे शहरात आणीबाणी जाहीर केली होती. या आठवडाभरात अशाच पद्धतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर या भीषण पावसाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.