मुंबई : न्युझिलंड हा जगाच्या नकाशावरील अगदी इटुकला देश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला केवळ क्रिकेटचा एक संघ म्हणून ओळख असलेला हा देश वास्तवात सामाजिक सुधारणांमध्ये पुढारलेल्या विचारांचा आहे. या देशाने 9 सप्टेंबर 1893 रोजी न्यूझीलंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार दिला. 


राज्यपाल लॉर्ड ग्लासगो यांनी महिलांना मतदानाचा अधिकार देणा-या विधेयकावर स्वाक्षरी केली. महिलांना हा अधिकार देण्यापूर्वी या देशात याबाबत खूप विचार मंथन झाले. 


जगावर राज्य करणा-या इंग्लंडमध्ये १९२८ साली महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. भारत १९४८ स्वतंत्र झाला पण संविधान बनवल्यानंतर म्हणजेच १९५० पासून नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. सौदी अरेबियामध्ये दोनवर्षांपूर्वी  २०१५ मध्ये महिलांनी पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केले. अमेरिकेने १९२० साली महिलांना मतदानाचा अधिकार दिला. न्युझिलंडमध्ये मात्र नोव्हेंबर १८९३ मध्ये  झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.