वेलिंग्टन: न्यूझीलंडच्या पंतप्रधान, जेसिंडा अर्डर्न या त्यांच्या नेतृत्तवक्षमतेसोबतच त्यांच्या जनतेशी असणाऱ्या नात्यासाठीही ओळखल्या जातात. सोशल मीडियावर अर्डर्न कायमच सक्रिय असतात. अशातच सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्याप्रामाणंच या व्हिडीओमध्ये त्या एका आईच्या रुपातही दिसत आहेत. जेसिंडा एका व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांनाच कोरोना प्रतिबंधांची आठवण करुन देताना दिसत आहेत. त्या असं करत असतानाच तितक्यातच 'मम्मीssss' अशी हाक ऐकू येते. 


जेसिंडा यांना हाक मारणारा हा आवाज आहे त्यांच्या चिमुकल्या लेकीचा. आई काम करत आहे, याकडे लक्ष न देता जेसिंडा यांची मुलगी त्यांना हाका मारत सुटते. त्यासुद्धा तिच्या या निरागसपणाला तितक्याच सुरेखपणे हाताळताना दिसत आहेत. 



तू आता झोप, ही झोपायची वेळ आहे. तू जा मी येतेच थोड्या वेळात; असं त्या मुलीला सांगताना दिसत आहेत. नेवे कॅमेरावर येत नाही, पण तिचा आवाज मात्र सर्वांचं लक्ष वेधत आहे. 


आई तिचं काम करत असतानाही नेवे मात्र तिच्यासाठीच हट्ट करत होती हे पाहून अखेर आर्डर्न यांनी अखेर लाईव्ह सेशन संपवत सर्वांची माफी मागत निरोप घेतला.