अमेरिकेतील टीव्ही अँकर सारा सिडनर यांनी अत्यंत धाडसीपणे लाईव्ह कार्यक्रमात आपल्याला कॅन्सर झाला असल्याचा खुलासा केला. आपण कॅन्सलच्या तिसऱ्या टप्प्याशी लढा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये 51 वर्षीय सारा सिडनर सांगत आहेत की, त्यांच्या केमोथेरपीचा दुसरा महिना सुरु आहे. तसंच त्यांची रेडिएशन ट्रिटमेंट सुरु असून, डबल मेस्टेटोमी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत सिडनर लाईव्ह कार्यक्रमात लोकांना कॅन्सर होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करतात. यावेळी त्या 8 पैकी एका महिलेला स्तनाचा कॅन्सर होतो अशी माहिती देतात. यावेळी त्यांनी आपल्याला कॅन्सर झाल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केलं. त्या सांगतात की, त्यांची जीवनशैली चांगली आहे आणि कुटुंबातील कोणालाही कॅन्सर झालेला नाही, पण त्यानंतरही आपण त्याच्या विळख्यात अडकलो आहोत. त्या सांगतात, "मी माझ्या मित्रांमधील आठपैकी आहे आहे. मी माझ्या आयुष्यात एकदाही आजारी पडलेली नाही".


"मी धुम्रपान करत नाही. मद्यपानही फार कमी करतो. माझ्या कुटुंबात कोणालाही स्तनाचा कॅन्सर झालेला नाही. पण तरीही मी स्टेज 3 कॅन्सरने पीडित आहे," अशी माहिती त्यांनी दिली.



सिडनर यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महिलांमध्ये आपल्या आरोग्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. खासकरुन कृष्णवर्णीय महिलांना गोऱ्या महिलांच्या तुलनेत कॅन्सर होण्याचा धोका 40 टक्के अधिक असतो. 


सारा सिडनर पुढे सांगतात की, "तर माझ्या सर्व बहिणींनो, सावळ्या, गोऱ्या सर्वांनी काळजी घ्या. आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करा. कॅन्सर होण्याआधीच तो समजून घेण्याचा प्रयत्न करता. मला निवडल्याबद्दल मी कॅन्सरचे आभार मानते. मला इतकं समजलं आहे की, आयुष्यात तुम्ही कितीही नरकयातना सोसत असलात तरी अद्यापही मी वेड्याप्रमाणे या आयुष्यावर प्रेम करते".


आपले अश्रू रोखत त्या पुढे सांगतात की, "फक्त जिवंत राहणं हे माझ्यासाठी वास्तवात वेगळं आहे. मी आता जास्त आनंदी आहे कारण मूर्ख वाटणाऱ्या अनेक छोट्या गोष्टींकडे मी लक्ष देत असे, ज्या मला सतावत होत्या".


सिडनर यांच्या धाडसाचं लोक कौतुक करत आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडमध्येच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांच वडील आफ्रिकी-अमेरिकी आणि वडील ब्रिटीश आहेत. सीएनएन न्यूज सेंट्रलच्या त्या को-होस्ट आहेत. त्या महिलांच्या आरोग्यावर नेहमी बोलत असतात.