Live in Relationship and law : लग्नाआधी शारिरीक संबंध ठेवणं इंडोनेशिया (indonesia) या देशात आता गुन्हा असेल कारण लिव्ह इन रिलेशनशिप आणि विवाहपुर्व शारिरीक संबंधांवर या देशाच्या सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपवर (live in relationship) सध्या मोठ्या प्रमाणावर भाष्य केले जाते आहे. आफताब आणि श्रद्धा वालकर प्रकरणानंतर आता लिव्ह इन रिलेशनशिपचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे अनेक फायदे आणि तोटेही आता लोकांसमोर पुढे येत आहेत. देशात कोर्टानं या रिलेशनशिपवरही नियम आखून दिले आहेत तर इतर अनेक देशांमध्येही या रिलेशनशिपवर विविध नियम आहेत परंतु नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार इंडोनेशियामध्ये लग्नाशिवाय लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्नापुर्वीच्या लैंगिक संबंधांवर (physical relationships) कोर्टानं मनाई केली आहे. नुकताच इंडोनेशिया या देशात विवाहपुर्व लैगिंक संबंध आणि लिव्ह इन रिलेशनशिपला गुन्हेगार ठरवणारा कायदा तिकडच्या संसदेनं मंजूर केला आहे. याचा परिणाम समलैंगिक समुदायावरही होऊ शकतो असा अंदाज लावला जातो आहे. पण इंडोनेशियाच नाही तर या देशांमध्येही विवाहपुर्व लैंगिक संबंधांवर आणि लिव्ह इन रिलेशनशिपला बंदी आहे. (News Premarital physical relationship before marriage is also prohibited in these nine countries and is punishable by death viral news marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोनेशियाच्या संसदेने नवीन गुन्हेगारी कायद्याला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत लग्नाआधी सेक्स करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी याचे उल्लंघन करताना पकडले गेले तर त्याला 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते. सध्या या बातमीची जगभरात चर्चा होत आहे, पण असा कायदा करणारा इंडोनेशिया हा जगातील पहिला देश आहे असे नाही. जगात असे अनेक देश आहेत जिथे या प्रकारचा कायदा पाळला जातो आणि लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवल्यास इंडोनेशियापेक्षाही कठोर शिक्षेची तरतूद आहे. पाकिस्तान, इजिप्त, अफगाणिस्तान, इराण, फिलिपिन्स, सौदी अरेबिया अशा देशांमध्येही विवाहपुर्वी शारिरीक संबंध ठेवण्यास मंदी आहे.  


1. कतार


कतारमध्ये लग्नाशिवाय शारीरिक संबंध चुकीचे मानले जातात. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा होते. 


2. सौदी अरेबिया 


या देशातही कठोर नियम आहेत. येथे असे करताना पकडले असल्यास 4 साक्षीदार असणे आवश्यक आहे. 4 साक्षीदार सापडले तर दोषींना फटके मारण्याची प्रथा आहे. 


3. इराण


इथेही लग्नासाठी शारीरिक संबंध आवश्यक आहेत. लग्नापूर्वी सेक्स करणाऱ्यांना कठोर शिक्षा होते. 


4. अफगाणिस्तान


अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य आहे. येथे लग्नाशिवाय संबंध ठेवण्यास मनाई आहे. इथे कोणी असे करताना पकडले तर त्याला कठोर शिक्षा होते. 


5. पाकिस्तान


पाकिस्तानही या कायद्याचे मोठ्या प्रमाणात पालन करते. येथेही तुरूंगवासाची शिक्षा आहे. अविवाहित लोक लैंगिक संबंध ठेवताना पकडले गेले तर त्यांना 5 वर्षांपर्यंत शिक्षा आहे. 


8. फिलीपिन्स


फिलीपिन्स हा इस्लामिक देश नसला तरी येथील सरकारने लग्नापूर्वी शारीरिक संबंधांवरही बंदी घातली आहे. येथेही या कायद्याचे कोणी उल्लंघन केल्यास त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.


9. इजिप्त


येथे अविवाहित लोकांना शरीरसंबंध ठेवण्यास कडक मनाई आहे. 2017 मध्ये दोहा सलाह नावाच्या टीव्ही प्रेझेंटरने टीव्हीवर लग्नापूर्वीच्या नात्याची चर्चा केली होती, त्यानंतर तिला 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 43 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.