गुरूत्वीय लहरींचा शोध लावणाऱ्या तीन संशोधकांना नोबेल पुरस्कार जाहीर !
गुरूत्वीय लहरींचा शोध लावणारे तीन अमेरिकन संशोधक रीनर वेईस, बॅरी बॅरीश आणि किप थॉर्न यांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
अमेरिका : गुरूत्वीय लहरींचा शोध लावणारे तीन अमेरिकन संशोधक रीनर वेईस, बॅरी बॅरीश आणि किप थॉर्न यांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. सुमारे शतकभरापूर्वी अल्बर्ट आईनस्टाईन यांनी या गुरूत्वीय लहरींचं भाकित केलं होतं. गेल्या वर्षी लागलेला गुरूत्वीय लहरींचा शोध ही अंतराळशास्त्रातली मोठी क्रांती मानली जात आहे. लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव ऑब्झर्वेटरी अर्थात लिगो या प्रयोगशाळेमध्ये या तिघा संशोधकांनी गुरूत्वीय लहरींचं अस्तित्व दाखवून दिलं. तिघांपैकी वेईस यांना अर्धा पुरस्कार तर बॅरिश आणि थॉर्न यांना 25 टक्के पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.