लंडन : वैद्यकशास्त्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांना आज नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मेडिसिन क्षेत्रात जगातील सर्वोच्च समजला जाणारा हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला आहे. फिजिओलॉजी या वैध्यशास्त्रातील शोधासाठी विल्यम जी केलिन ज्युनियर, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल सेमेन्जा या तिघांना संयुक्तपणे नोबेल पुरस्काराने देऊन गौरविण्यात येणार आहे. नोबेल पुरस्कार विजेत्याला पदक, प्रशस्ती पत्र आणि ४.५ कोटी रुपये रोख देण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तीन शास्त्रज्ञांनी कोशिकाएंच्या ऑक्सिजन ग्रहणावर करण्यात आलेल्या शोधासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आज वैद्यकशास्त्रातील क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उद्या भौतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. तसेच १४ ऑक्टोबरपर्यंत अन्य पाच क्षेत्रातील विजेत्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. 



स्वीडिश अकादमी २०१८ आणि २०१९ या दोन्ही वर्षांसाठी साहित्य नोबेल पुरस्कारांची घोषणा करणार आहे. गेल्यावर्षी लैंगिक शोषण प्रकरण समोर आल्याने २०१८ च्या साहित्य नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली नव्हती.


या दिवशी होणार  घोषणा  


मंगळवार, ८ ऑक्टोबर - भौतिक शास्त्र, बुधवार, ९ ऑक्टोबर - रसायनशास्त्र, गुरुवार, १० ऑक्टोबर - साहित्य, शुक्रवार, ११ ऑक्टोबर - शांतता, सोमवार, १४ ऑक्टोबरला - अर्थशास्त्रासाठी  नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.


पुरस्काराचे स्वरुप


नोबेल पुरस्कार विजेत्याला पदक, प्रशस्ती पत्र आणि ४.५ कोटी रुपये रोख तसेच २३ कॅरेट सोन्याचा २०० ग्रॅमचे पदक आणि प्रशस्तीपत्र दिले जाते. पदक म्हणून नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल यांचे छायाचित्र असलेले सोन्याचे पदक दिले जाते. या पदकावर त्यांचा जन्म आणि मृत्यू याची तारीख असते. तर पदकाच्या दुसऱ्या बाजुला युनानी देवी आयसिसचे चित्र, रॉयल अकादमी ऑफ सायन्स स्टॉकहोम पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीची माहिती दिलेली असते.