हगात्ना : उत्तर कोरिया आता दिलेल्या धमकीवरून पिछेहाट करताना दिसत आहे. उत्तर कोरियाने गुआम द्वीपवर चार मिसाइल टाकण्याच्या धमकीवरून आता मागे फिरताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे आता अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी काही प्रमाण सुटकेचा निश्वास सोडला आहे. आणि आता इथे आनंदाच वातावरण आहे. लेफ्टिनेंट गवर्नर रे टोनोरियोने सांगितले की, इथे असं कोणत्याही प्रकारचे संकेत दिसत नाहीत. भविष्यात अशा प्रकारे कोणताही मिसाइल हल्ला होईल. त्यामुळे चिंतेचे वातावरण नाही. 


कोरियाचे फक्त शक्ती प्रदर्शन होते 
गुआम होमलँड सिक्युरिटीचे जॉर्ज शाफॉरसने त्या रिपोर्टना नाकारलं आहे. ज्यांनी सांगितलं होतं की उपग्रहवरून पाठवण्यात आलेल्या फोटोंमध्ये उत्तर कोरियाचे प्रक्षेपण करण्यासाठी मिसाइल तैनात करण्यात आल होते. त्यांचे असे म्हणणे आहे की, मंगळवारी उत्तर कोरियाच्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त  हे केवळ शक्ती प्रदर्शन होते. 


हे एक प्रकारचं षडयंत्र 
त्यांनी सांगितले की, हे एक प्रकारचं षडयंत्र आहे. आज कोरियाच्या प्रायद्विपसाठी हा मोठा दिवस आहे. हा त्यांचा स्वातंत्र्यता दिवस होता. उत्तर कोरियाचा निर्णय घेण्यासाठी ही फक्त एक प्रकारची प्रवृत्ती आहे. आम्ही या गोष्टीने खुष आहोत की, त्यांनी दोन पावले मागे घेतले आहेत. 


अमेरिकेच्या उपग्रहांना याची माहिती होती 
सीएनएनच्या माहितीनुसार, अमेरिकेतील छुफ्या उपग्रहांना उत्तर कोरियाच्या मोबाइल मिसाइल लाँचरबाबत माहिती होती. ज्यातून हे संकेत मिळत होते की, संभावित प्रेक्षेपणासाठी तयारी केली जात आहे.