मुंबई : उत्तर कोरिया (North Korea) आणि दक्षिण कोरिया (Soth Korea) दोघेही कट्टर वैरी. दोघांच्यामधून विस्तव सुद्धा जात. त्याच उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्यामुळे दोघांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली असल्याचा दावा दक्षिण कोरियाकडून करण्यात आलाय. 


उत्तर कोरियाचा सनकी हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong-un) याने अनेकवेळा जगाला अण्विक हल्ल्याची धमकी देखील दिली आहे. गरज पडल्यास आपण अण्विक हल्ला करु असं सुद्धा तो म्हणालाय. दरम्यान याच पार्श्वभूमीवर क्षेपणास्त्र चाचणीमुळे दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये वादाची स्थिती निर्माण झाली आहे.


उत्तर कोरियाची ताकद


काही दिवसांपूर्वी किम जोंग उन याने रात्रीची एक परेड भरवली होती. जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना किम जोंग उनच्या या परेडने जगाचं लक्ष्य आपल्याकडे वेघून घेतलं होतं. या परेडमध्ये त्याने Hwasong-17 ही मिसाईल जगाला दाखवून दिली. याची क्षमता 15 किमी पर्यंत मारा करण्याची आहे. उत्तर कोरियाने या वर्षी सुमारे 13 क्षेपणास्त्राच्या चाचण्या केल्या आहेत.