उत्तर कोरिया कधीही करु शकतो अमेरिकेवर हल्ला
उत्तर कोरिया कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची तयारी करत आहे. याबद्दल, उत्तर कोरियाने अनेक शहरांतील लोकांना शहर खाली करण्यासाठी सांगितले आहे.
नवी दिल्ली : उत्तर कोरिया कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची तयारी करत आहे. याबद्दल, उत्तर कोरियाने अनेक शहरांतील लोकांना शहर खाली करण्यासाठी सांगितले आहे.
अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी दक्षिण कोरियाच्या दौ-यावर सांगितले की आण्विक हल्ल्याच्या शक्यतेमध्ये आता वाढ झाली आहे. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचले आहे. उत्तर कोरिया युद्धाचा सराव करत आहे. दक्षिण कोरियाच्या न्यूज एजन्सीने ही माहिती दिली आहे.
उत्तर कोरियाने राजधानीमध्ये नाही पण परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये युद्धाचा सराव केला आहे. यामागचा उद्देश काय याबाबत अनेक चर्चा आहेत.
दरम्यान, उत्तर कोरियाने गेल्या महिन्यात अनेक वेळा म्हटले आहे की ते अमेरिकेला नष्ट करू शकतात. त्यांचं क्षेपणास्त्र अमेरिकन शहरापर्यंत कधीही पोहोचू शकेल.