बीजिंग: उत्तर कोरियाचा हुकुमशाहा किम जोंग-उन याने सत्तेची सूत्रे हाती घेतल्यावर पहिल्यांदाच देशाबाहेर पाऊल ठेवत विदेश दौरा केला. या दौऱ्यात त्याने शेजारी राष्ट्र असलेल्या चीनला भेट दिली. जगभरातील प्रसारमाध्यमांसाठी ही घटना अविश्वसनीय होती. पण, किम जोंगने ३ पिढ्यांनी प्रवास केलेल्या आपल्या खानदानी ट्रेनने दौऱ्यास सुरूवात केली आणि तो जेव्हा चीनला पोहोचला तेव्हा प्रसारमाध्यमांचाही विश्वस बसला. त्याचा हा दौरा ट्रेनमुळेही खास ठरला आहे. कारण, हवाई मार्गाने प्रवास करणे सोपे असतानाही जोंगने ट्रेनचा पर्याय निवडला. महत्त्वाचे असे की, हवाई मार्गात घातपाताचा धोका आणि वातावरणात बदल झाल्यामुळे हवाई उड्डाणावर येणारी मर्यादा विचारात घेऊन जोंग परिवार शक्यतो ट्रेनचा प्रवास करतो. हिरवा रंग आणि त्यावर पिवळे पट्टे असलेली ही ट्रेन किमसाठी खास आहे. कारण, त्याच्या या आधीच्या तीन पिढ्यांनीही याच ट्रेनने प्रवास केला आहे.


जोंग ईल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किम जोंग उनचे वडील जोंग ईल यांचा डिसेंबर २०११मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर उत्तर कोरियाच्या सत्तेची सूत्रे किम जोंग यांच्याकडे आली. ईल यांना हवाई प्रावासाबाबत भयानक तिटकारा होता. त्यांनी आपल्या हायातीत साधारण एक डजनभर दौरे केले. त्यापैकी अधिक दौरे हे चीनचेच होते. या विदेश दौऱ्यावर ते ट्रेननेच जात. या दौऱ्यादरम्यान ते मेजवानींचेही आयोजन करत. ज्यात मद्य, मनोरंजन यांचा एथेच्छ समावेश असायचा. अनेकदा हे दौरे प्रचंड गुप्त असायचे.  


किम ईल सुंग


उत्तर कोरियाचे संस्थापक आणि किम जोंग इल यांचे वडील १९८४मध्ये पुर्व युरोपपर्यंत ट्रेननेच गेले होते.



किम जोंग उन


दरम्यान, चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर असेलेल्या किम जोंगसोबत पत्नी री सोल जू हिसुद्धा आहे. या दौऱ्यात किमने चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग यांच्यासोबत चर्चा केली.