Viral: 1300 फूट खोल समुद्रात सापडले जुने जहाज, मात्र, याची कंडिशन पाहून सर्व जण चक्रावले
Viral News : नॉर्वेच्या (norway) सर्वात मोठ्या सरोवर मिओसामध्ये (norway excavates) सर्वेक्षण सुरू होते. या सर्वेक्षणादरम्यान संशोधकांना शेकडो वर्षे जुने जहाज सापडले आहे. या सरोवरात संशोधक युद्ध साहित्याचा शोध घेत होते.
Viral News : समुद्रात अनेक जहाज बुडत असतात. त्यामुळे त्याचे अवशेष सापडल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत 1300 फुट खोल समुद्रात जहाज (Ship Found) सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेची विशेषता म्हणजे, हे जहाज (Ship Found) इतक्या वर्ष समुद्राच्या खोलात असुन सुद्धा चांगल्या अवस्थेत होते. जहाजाच्या कोणताच भाग तुटला नव्हता. ज्या अवस्थेत ते बुडाले होते. त्याच अवस्थेत आतापर्यंत होते. त्यामुळे या जहाजाला पाहून सर्वंच चक्रावले आहेत.
कुठे सापडले?
नॉर्वेच्या (norway) सर्वात मोठ्या सरोवर मिओसामध्ये (norway excavates) सर्वेक्षण सुरू होते. या सर्वेक्षणादरम्यान संशोधकांना शेकडो वर्षे जुने जहाज सापडले आहे. या सरोवरात संशोधक युद्ध साहित्याचा शोध घेत होते. या दरम्यान त्यांना सरोवराच्या 1350 फूट खोलात जहाज सापडले आहे. मिशन मिओसा प्रकल्पाअंतर्गत (Mission Misosa Project) संशोधकांनी हा शोध लावला आहे. 363 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेल्या या सरोवराच्या पृष्ठभागामध्ये लपलेली रहस्ये उच्च रिझोल्यूशन सोनार तंत्रज्ञानाने शोधून काढणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
सरोवराच्या पृष्ठभागावरून शेकडो वर्षे जुन्या जहाजाचे अवशेष सापडले (Ship Found) आहेत. हे जहाज शेकडो वर्षे जुने असूनही अतिशय चांगल्या स्थितीत आहे. इतका वेळ लोटून सुद्धा जहाज सुस्थितीत आहे, असे संशोधकांनी सांगितले आहे. जहाजाची आगळीवेगळी रचना आणि त्याच्या फळ्या या तलावाच्या सागरी इतिहासाची साक्ष देतात. हे जहाज 1300 ते 1800 च्या दरम्यानचे असल्याचे सांगितले जात आहे.
जहाजाची अवस्था कशी आहे?
जहाजाचा हा अवशेष (Ship Found) 1350 फूट खोलवर सापडला आहे. या जहाजाची लांबी 33 फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. सरोवरातील स्वच्छ पाणी आणि लाटांच्या अनुपस्थितीमुळे जहाज त्याच्या मूळ स्थितीत असल्याचे दिसते. मात्र, काही लोखंडी खिळ्यांना नक्कीच गंज लागला आहे.
हे जहाज 1300 ते 1850 च्या दरम्यान बांधले गेले असावे. हे जहाज तलावाच्या मध्यभागी सापडले आहे. त्यामुळेच हे जहाज खराब हवामानामुळे बुडाले असावे, असे नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ संशोधक आणि या मिशनचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर ओयविंड ओडेगार्ड यांनी सांगितले आहे.
युद्धसामुग्री सापडल्याने शोध मोहीम
नॉर्वेजियन डिफेन्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंटने दोन महिन्यांच्या निरीक्षणानंतर युद्धसामुग्री सापडल्यानंतर नॉर्वे सरोवरात ही मोहीम सुरू केली होती. नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या मते, हा तलाव पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत आहे. या तलावातून देशातील सुमारे 1 लाख लोकांपर्यंत पाणी पोहोचते. त्यामुळे त्यात युद्धसाहित्य असल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता होती. त्यामुळे ही युद्धसामग्री बाहेर काढण्याचे कार्य हाती घेण्यात आले होते.
दरम्यान या सरोवरात युद्धसामग्री शोधत असताना, या जहाजाचा शोध (Ship Found) लागला आहे. हे जहाज बाहेर काढण्यात आले असुन त्याला पुर्नजीवीत करण्याचे काम करण्यात आहे. या जहाजाची एकच चर्चा आहे.