नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खरी ठरली; 450 वर्षांपूर्वी केले होते इस्रायलचे भाकित
नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खरी ठरली आहे. नॉस्ट्रॅडॅमसने 450 वर्षांपूर्वी इस्रायलबाबत धोक्याचे भाकित केले होते.
Israel War : हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलनं बदला घेण्यास सुरूवात केली आहे. हमासच्या 400 हून अधिक दहशतवाद्यांना आतापर्यंत इस्रायलनं कंठस्नान घातलंय. हल्ल्यानंतर इस्रायल पेटून उठलंय. फ्रान्सचा भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खरी ठरली आहे. नॉस्ट्रॅडॅमसने 450 वर्षांपूर्वी इस्रायलचे भाकित केले होते.
इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरू
इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरू झालंय. हमासच्या हल्ल्यात इस्रायलची पुरती दाणादाण उडाली. सुमारे 300 हून अधिक इस्रायली नागरिकांचा बळी गेला. त्यामुळंच आता इस्रायल देखील पेटून उठलंय. इस्रायलनं ऑपरेशन आयर्न स्वॉर्डची घोषणा केलीय. त्यानुसार इस्रायली सैन्यानं रातोरात हमासला मुँह तोड जबाब देण्यास सुरूवात केली. दे दणादण रॉकेट हल्ले करून गाझा पट्टीची पुरती चाळण करून टाकली. हमासचा कब्जा असलेले शेकडो तळ नेस्तनाबूत करण्यात आलेत. अत्याधुनिक शस्त्रांसह सुसज्ज इस्रायली सैन्यदलानं दुश्मनांचा खात्मा करण्यास सुरूवात केली.
नॉस्ट्रॅडॅमसने 450 वर्षांपूर्वी केले होते इस्रायलचे भाकित
नॉस्ट्रॅडॅमसने त्याच्या लेस प्रोफेसीज या पुस्तकात 450 वर्षांपूर्वी भितीदायक भाकित केले होते. 2023 मध्ये महायुद्ध होईल असे भाकित नॉस्ट्रॅडॅमसने केले आहे. आता इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले आहे. 2023 चा संदर्भ देत, नॉस्ट्राडेमसने 450 वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात एक भाकित लिहिले होते 7 महिन्यांचे एक मोठे युद्ध होईल, ज्यामध्ये शेकडो लोंकाचा बळी जाईल असे म्हंटले होते.
नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी आतापर्यंत 70 टक्के खरी ठरलीय
फ्रान्सचा भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमसनं पाच शतकांपूर्वी वर्तवली होती. आता त्याची भविष्यवाणी पुन्हा एकदा जगासाठी चर्चेचा विषय बनलीय. त्याच्या पुस्तकात एकूण 6 हजार 338 भाकितं वर्तवली आहेत. यात त्याने धोक्याचा इशारा दिला आहे. अमेरिकन डॉलरची मोठी घसरण होईल असंही नॉस्ट्रॅडॅमसनं म्हंटलंय. जगातील अनेक भागात भीषण आग, दुष्काळ, भूकबळी आणि पूरस्थिती निर्माण होईल असं भाकितही त्यानं वर्तवलंय. नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी आतापर्यंत 70 टक्के खरी ठरलीय.