7 Continents In The World :  जगात सात खंड आहेत हेच आजपर्यंत आपण शाळेत शिकलो.  लहानपणी शाळेत शिकलेला हा भूगोल अजूनही आपल्या लक्षात आहे. मात्र, हा भूगोल चुकीचा आहे की काय अशी शंका उपस्थित करणारे संशोधन समोर आले आहे.  जगात सात नाही तर फक्त सहाच खंड आहेत. असा खळबळजनक दावा संशधकांनी केला आहे. संशोधकांच्या या नव्या दाव्याने जुन्या  सिद्धांताला आव्हान दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक असे सात खंड आपल्या पृथ्वीवर आहेत. पृथ्वीचे सुमारे 30 % क्षेत्र हे या सात खंडांनी व्यापले आहे. जगात 7 नाही तर फक्त सहाच खंड असल्याचा दावा करण्यात आला आहे.   Earth.com मध्ये एक अहवाल प्रकाशित झाला आहे. या अहवालात डॉ. जॉर्डन फाथियन यांच्या नेतृत्वाखालील डर्बी विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने पृथ्वीवर फक्त सहा खंड असल्याचा दावा केला आहे. या नव्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 
डॉ. फॅथेन यांच्या मते युरोपियन आणि उत्तर अमेरिकन खंडांचे विखंडन पूर्ण झालेले असा दावा करण्यात आला आहे.  उत्तर अमेरिकन आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्स अद्याप विभक्त झालेले नाहीत. यामुळे जगात 7 नाही तर फक्त सहाच खंड असल्याचा दावा डर्बी विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने केला आहे. प्लेट टेक्टोनिक्स सिद्धांताच्या मदतीने त्यांनी हा दावा केला आहे. 


नवीन संशोधन हे ग्रीनलँड समुद्र आणि उत्तर अटलांटिक महासागर यांच्यामध्ये वसलेल्या आइसलँडच्या अभ्यासावर आधारित आहे.  60 दशलक्ष वर्षांपूर्वी मध्य-अटलांटिक रिजमधील घर्षणाने  आईसलँडची निर्मिती झाली असे मानले जाते.  नविन संशोधनात या सिद्धांताला आव्हान देण्यात आले आहे.  आइसलँड आणि ग्रीनलँड देखील आइसलँड फॅरो रिजमध्ये युरोपियन आणि उत्तर अमेरिकन खंडांचे तुकडे आहेत. 


गायब असलेला 8वा खंड सापडला समुद्रात 


375 वर्षांपासून पृथ्वीवरुन गायब असलेला 8वा खंड समुद्रात सापडला आहे. वैज्ञानिकांनी अथक परिश्रमानंतर हा आठवा खंड शोधून काढला आहे.  वैज्ञानिकांचे हे आजपर्यंतचे सर्वात मोठं संशोधन मानले जात आहे. हे पृथ्वीवर सर्वात लहान महाद्विप मानले जात आहे. झीलँडिया असे या नव्या महाद्विपाचे नाव आहे. या महाद्विपाचा 94 टक्के भाग हा समुद्रात बुडाला होता. न्यूझीलंड हा झीलँडियाचाच एक भाग आहे. 375 वर्षांपूर्वी हा खंड अस्तित्वात होता. समुद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या खडकांच्या नमुन्यांचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी झीलँडिया हे आठवे महाद्विप शोधून काढल्याची माहिती जाहीर केली.  Phys.org ने याबाबतचे वृत्त दिले आहे. झीलँडिया हे महाव्दिप सुमारे 50 लाख स्क्वेअर किमी परिसरात पसरले होते.  मादागास्करपेक्षा ते 6 पट मोठे होते. हा जगातील सर्वात लहान आणि पातळ खंड मानता जात आहे. न्यूझीलंडच्या क्राऊन रिसर्च इन्स्टिट्यूटचे भूवैज्ञानिक अँडी टुलोच हे या खंडाचा शोध घेणाऱ्या संघाचा एक भाग होते.