Titan submersible : समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी निघालेल्या टायटन पाणबुडीला जलसमाधी मिळाली. या पाणबुडीत बसलेले पाचही जण सुप्रसिद्ध अब्जाधीश होते. 18 जून 2023 रोजी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर   टायटन पाणबुडी आणि या  टायटन पाणबुडीची निर्मीती करणारी कंपनी ओशनगेट (OceanGate) चांगलीच चर्चेत आली. याच ओशनगेट कंपनीने आता 1000 लोकांना शुक्र ग्रहावर पाठवण्याचा प्लान बनवला आहे. 2050 पर्यंत मानवाला शुक्र ग्रहावर नेण्याचे या कंपनीचे टार्गेट आहे. 


मानवाला शुक्र ग्रहावर पाठवण्याची योजना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिजनेस इनसाइडरने याबाबतचे वृत्त दिले आहे. 2020 मध्ये ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी 10 लाख लोकांना मंगळ ग्रहावर नेण्याचे टार्गेट असल्याचे ट्विट 2020 मध्ये केले होते. अशाच प्रकारे आता   2050 पर्यंत मानवाला मंगळ ग्रहावर नेण्याचे ओशनगेट कंपनीचे स्वप्न आहे. ओशनगेट (OceanGate) कंपनीचे को-फाउंडर गुइलेर्मो सोहनेलिन (Guillermo Söhnlein) यांनी कंपनीच्या या योजनेबद्दल माहिती दिली.


Humans 2 Venus


ओशनगेट कंपनी सन 2020 पासून ह्यूमन्स 2 वीनस (Humans2Venus) या प्रोजेक्टवर काम करत आहे. शुक्र ग्रहावरील तापमान अतिशय उष्ण आणि पृष्ठभाग अतिशय कठीण आहे. यामुळे येथे मानव राहणे अशक्य आहे. मात्र, शुक्राच्या वातावरणात ग्रहाच्या पृष्ठभागापासून 30 मैल वर एक क्षेत्र आहे. येथे मानव राहू शकतात. या क्षेत्राचे तापमान आणि दाब खूपच कमी आहे. 


विशेष म्हणजे शुक्राचे वातावरण प्रामुख्याने कार्बन डाय ऑक्साईडने बनलेले आहे आणि तेथे सल्फ्यूरिक ऍसिडचा पाऊस पडतो. असे वातावरण मनुष्याला राहण्यासाठी अनुकूल असल्याचा दावा सोहनेलिन यांनी एका शोध निबंधाद्वारे केला आहे. 


टायटन पाणबुडी का आली होती चर्चेत?


टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी निघालेल्या टायटन पाणबुडी खोल समुद्रात बुडाली.  या पाणबुडीतील सर्व 5 जणांचा मृत्यू झालाय. या पणबुडीमध्ये मोठ्या दाबामुळे टायटनचा स्फोट झाला त्यामुळे सर्वांना जीव गमवावा लागलाय. 18 जून रोजी ओशनगेट कंपनीच्या या पाणबुडीचा प्रवास सुरू झाला, मात्र पहिल्या दोन तासांतच या पाणबुडीशी संपर्क तुटला. त्यानंतर या पाणबुडीचे अवशेष समुद्रात 12 हजार 500 फूट खोलवर सापडले होते. या पाणबुडीत बसलेले पाचही जण सुप्रसिद्ध अब्जाधीश होते. त्यात ओशनगेटचे सीईओ स्टॉकन रश, प्रिन्स दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि समुद्रशास्त्रज्ञ पॉल-हेन्री नार्गि-ओलेट यांचा समावेश होता.