अंकारा : जगात कधी-कधी अशा घटना घडतात, जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. अशीच एक घटना तुर्कीमध्ये पाहायला मिळाली. येथे एका अनोख्या आणि विचित्र दिसणार्‍या शेळीच्या बाळाचा (कोकराचा) जन्म झाला आहे. येथील लोक याला चमत्कार मानत आहेत. कोकराचा जन्म परिसरातील लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबेंदू बनला आहे. या कोकरूला पाहण्यासाठी दुरवरून येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिरर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तुर्कीतील मर्सिन येथील रहिवासी हुसेन आणि आयसेल तोसून हे शेतकरी शेती आणि पशुपालन करतात. त्यांच्या घरात एक विचित्र दिसणारा कोकरू जन्माला आल्याने हे लोक आश्चर्यचकीत झाले आहेत. या काळ्या रंगाच्या कोकरूची त्वचा सुरकुत्या आणि केसहीन आहे.


कोकराला पाहण्यासाठी लोकांची झुंबड


या कोकरूच्या जन्माची बातमी हळूहळू सर्वदुर पसरली. शेतकरी दाम्पत्याचे नातेवाईक सुलेमान डेमिर यांनी सांगितले की, ते 67 वर्षांचे आहेत. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच असा कोकरू पाहिला आहे. हा देवाचा चमत्कार आहे.


जुळे कोकरू जन्माला


त्याने सांगितले की बकरीने जुळ्या कोकरांना जन्म दिला आहे. त्यापैकी एकाचा जन्मताच मृत्यू झाला होता, तर दुसरे कोकरू असामान्य निघाले.