रियाध : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावांनी जुलै 2015 नंतरचा सर्वोच्च स्तर गाठलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौदी आरेबियाच्या युवराजानं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 11 इतर राजकुमार आणि बड्या व्यापऱ्यांना ताब्यात घेतलंय. त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या भावांवर झाला.  


भारत ज्या देशांकडून कच्चे तेल आयात करतो, त्या देशांच्या समूहाला ब्रंट क्रूड असं म्हणतात. ब्रँट क्रूडच्य़ा एका बॅरलचा भाव 62.27 डॉलर्सवर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे अर्थात घरगुती इंधनाच्या दरातही मोठी वाढ होण्याची शक्यताय. पेट्रोल आणि डिझेल दोन्हीवरही मोठ्याप्रमाणात उत्पादन शुल्क लावण्यात येतं.