म्युनिच : जगात असा एक फेस्टिव्हल आहे जिथे दारु पिण्याची परंपरा आहे. जर तुम्हीही बियरचे शौकीन आहात तर तुम्ही या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ शकता. इथे इतक्या मोठ्या प्रमाणात बियर मिळते की जणू काही बियरचा पूरच आलाय. हा फेस्टिव्हल जर्मनीमध्ये साजरा केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फेस्टिव्हलचे नाव oktoberfest असे आहे. 12 ऑक्टोबर 1810मध्ये पहिल्यांदा हा फेस्टिव्हल साजरा करण्यात आला होता. म्युनिचमधील बियर महोत्सवर हा जगातील सर्वात मोठा लोकोत्सव मानला जातो. 


पाच दिवस हा फेस्टिव्हल चालतो. पहिल्यांदा साजऱ्या करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलमध्ये 40 हजार लोक सहभागी झाले होते. प्रिंस लुडविग आणि प्रिंसेस थेरेसे यांच्या लग्नानंतर या फेस्टिव्हलद्वारे जल्लोष साजरा करण्यात आला होता. ही परंपरा आजही कायम आहे. 


आकड्यांनुसार, जर्मनीमध्ये 2016मध्ये झालेल्या फेस्टिव्हलमध्ये तब्बल 60 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. यात 70 लाख लीटर बीयर आणि 5 लाख किलो चिकन खाल्लं गेलं होतं.