शांघाई : असं म्हणतात की काळ आला होता पण ती वेळ आली नव्हती. डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या वृद्ध व्यक्तीचं हृदय धडधडत होतं. मात्र ही गोष्ट तिथे कोणाचाच लक्षात आली नाही. जेव्हा शवविच्छेदनासाठी नेलं तेव्हा हा सगळा भोंगळ कारभार समोर आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यक्तीला जगवण्यासाठी डॉक्टर आणि कुटुंबातील लोक जीवाचं रान करतात तिथे मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुटुंबाचं छत्र हरपलं आणि वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली. कुटुंबाचा आधार नाही आणि विचारायलाही किंवा न्याय मागायलाही पाठबळ नाही अशा हतबल झालेल्या वृद्ध व्यक्तीसोबत भयंकर प्रकार घडला. 


वृद्धाश्रमात राहणाऱ्या व्यक्तीला चक्क मृत घोषित केलं. जेव्हा त्याला बॅगमध्ये बंद करून शवविच्छेदनासाठी पाठण्यात आलं तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीच्या काळजाचे ठोके धडधड होते. या व्यक्तीचा जीव तिथल्या कर्मचाऱ्यांनी वाचवला. 



डॉक्टरांचा सगळा भोंगळ कारभार या प्रकरणामुळे समोर आला. त्यानंतर या वृद्ध व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वाढत्या कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन लावण्यात आलं. त्यामुळे नागरिकही त्रस्त आहेत. 


यामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे डॉक्टरांच्या निष्काळजीपणा समोर आला. त्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका जिवंत व्यक्तीला चक्क डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. शवागरातील कर्मचाऱ्यांनी या वृद्ध व्यक्तीला जीवदान दिलं.


शवविच्छेदनगृहातील व्यक्ती या वृद्धासाठी देवमाणूस ठरला कारण त्याच्यामुळे या वृद्धाला जीवदान मिळालं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


चीनमधला एक व्हिडिओ व्हायरल झालाय.  हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. शांघायमध्ये1 मार्चपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.