Oldest Alphabet In The World: गतकाळात किंबहुना मानवी उत्क्रांतीची सुरुवात झाली, तेव्हा या जगाचं चित्र कसं असेल, संवाद कसा साधला जात असेल? व्यवहार कसा केला जात असेल? असे कैक प्रश्न आजवर उपस्थित झाले आणि या प्रश्नांची उत्तरं पुरातत्त्वं विभागात कार्यरत असणाऱ्या कैक जाणकारांनी जगासमोर आणली. त्यातल्याच एका रंजक प्रश्नाचं उत्तर आता नव्यानं समोर आलं असून, मानवी जीवनातील सुरुवातीच्या दिवसांमध्ये वापरला जाणारं पहिलंवहिलं अक्षर कोणतं होतं याचा उलगडा आता झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरातत्त्वं विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या उत्खननातून आता जगातील सर्वात जुन्या बाराखडीचे पुरावे समोर आले आहेत. सीरियातील एका अतिप्राचीन थडग्यामध्ये हे पुरावे मिळाले असून, यातूनच वर्णमालेचा जन्म नेमका कधी झाला होता याविषयीचे संकेत पाहायला मिळत आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांनी नुकतंच अमेरिकन सोसायटी ऑफ ओवरसीज रिसर्चच्या वार्षिक बैठकीदरम्यान या शोधाची माहिती दिली. मातीच्या साधारण लंबवर्तुळाकार वस्तूवर असणाऱ्या कैक गोष्टी दूर केल्यानंतर एक अशी लिखाणाची शैली समोर आली जी साधारण ईसवी सनपूर्व 2400 मधील असल्याचं सांगितलं गेलं. 


कोणत्याही अक्षराच्या ज्ञात असणापूर्वी साधारण 500 वर्षांच्या आधीच्या कालखंडातील ही तेव्हाची बाराखडी अर्थात वर्णमाला असल्याचं सांगितलं जात आहे. मानवी संस्कृतीतच या वर्णमालेचा विकास झाला होता. पुरातत्त्वंशास्त्रज्ञांनी पश्चिमी सीरियातील मध्यम आकाराच्या शहरी केंद्रांमधून टेल उम्म-एल मार्रा इथून या वस्तू मिळवल्या. 


साधारण मागील 16 वर्षांपासून सुरु असणाऱ्या उत्खननामध्ये सुरुवातीला कांस्य युगातील थडगी सापडली. एका थडग्यामध्ये 6 मानवी सापळेही सापडले. त्याशिवाय सोनं, चांदीचे दागिने, स्वयंपाकाची भांडी, एक भाला, मातीची भांडी आणि याच भांड्यांच्या शेजारी मातीच्या लंबवर्तुळाकार गोष्टी आढळल्या. रेडियो कार्बन डेटिंगच्या विश्वसनीय वृत्तानुसार ही थडगी, कलाकृती आणि लेखनसाहित्य साधारण 4400 वर्षांपूर्वीचं आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Assembly Election Result : मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीविषयीची सर्वात मोठी अपडेट; मध्यरात्री 12 नंतर...


वर्णमाला असणाऱ्या वस्तूंचा शोध घेणाऱ्या प्राध्यापक ग्लेन श्वार्ट्ज यांच्या माहितीनुसार बाराखडीच्या लेखनशैलीनं लेखनकलेतच क्रांती आणली. कारण, ही बाराखडी राजघराणी आणि समाजात मानाचं स्थान असणाऱ्यांसाठी अधिक सुलभ ठरली. वर्णमालालेखनानं नागरिकांच्या जगण्याची, विचार करण्याची आणि संवाद साधण्याची पद्धत बदलली. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा नवनवीन प्रयोगांशी लोक फार पूर्वीपासूनच प्रयोग करायचे हेच या शोधातून आता सिद्ध होत आहे असं, मत पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी मांडलं. 
 
दरम्यान, प्राचीन इजिप्तमधील सर्वात जुनी चित्रलिपी साधारण 5200 वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जातं. आधुनिक इराणमधील प्राचीन मेसोपोटामिया शहर उरुक इथं सापडलेला क्यूनिफॉर्म टेक्स्टही साधारण 3400 ईसवी सनपूर्व असल्याचं सांगण्यात येतं. इतकंच नव्हे, तर  6,000  वर्षांपूर्वी प्रोटो-क्यूनिफॉर्मचेही पुरावे मिळाले असल्यामुळं वर्णमाला लेखन हा त्या काळच्या विचारसणीचं प्रतिबिंब आहे हेच प्रतीत होतं.