मुंबई : रस्ते अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कधी वाहतुकीचे नियम न पाळल्याने तर कधी ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात होत असतात. एक असाच विचित्र अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की पांढऱ्या रंगाच्या कारला टर्न घ्यायचा आहे. मात्र तो ते विसरला. तो मध्येच थांबला. त्यामुळे दोन विचित्र अपघात होतात. बाजूने येणारा ट्रक आणि मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे.


ट्रक चालक कारला वाचवण्याच्या नादात बाराच्या भावात जातो. ट्रकचाच अपघात होतो. या विचित्र अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला 50 लाखहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. 


या सगळ्यात कार चालक सुखरुप राहातो पण दोन ट्रकचं मोठं नुकसान होतं. कार चालक टर्न मारून आपला आपला निघून जातो. कार चालकाचा थोडक्यात जीव वाचला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.