जिनेव्हा : जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनचे  (Omicron Variant) संकट वाढताना दिसून येत आहे. आता Omicronने सौदी अरेबियातही (Saudi Arabia) शिरकाव केला आहे. आखाती देशात अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. ओमायक्रोनचा धोका दिवसेंदिवस वाढत अधिक गढद होत असताना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) स्पष्ट केले आहे की, कमीतकमी ओमायक्रोन 23 देशांमध्ये पसरला आहे. आणि याचा इतर देशांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WHOचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी बुधवारी सांगितले की ओमायक्रोनचा प्रसार डब्ल्यूएचओच्या सहा क्षेत्रांपैकी पाच प्रदेशांमध्ये किमान 23 देशांमध्ये झाला आहे. Omicron प्रकार आता आणखी देशांमध्ये पसरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.


Vaccine प्रभावहीन ठरत आहे का?


कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोन जगभरात चर्चेचा विषय झाला आहे. अनेक आरोग्य तज्ज्ञांनी ओमायक्रोनचे वर्णन डेल्टा प्रकारापेक्षा प्राणघातक असे केले आहे. Omicron मुळे, जगातील अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेचा प्रवास रोखला आहे तसेच बंद केला आहे. कोविडचा हा प्रकार लस घेतलेल्या लोकांमध्येही वेगाने पसरत आहे. यातून संसर्ग वाढण्याचा धोका जास्त असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे.


Omicron बद्दल माहितीचा अभाव


दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस चे (NICD) कार्यकारी संचालक एड्रियन पूरन म्हणाले, "आम्हाला वाटले नव्हते की  Omicron हा डेल्टा प्रकाराला मागे टाकेल." हे बहुधा ट्रान्समिशनच्या दृष्टीने एक विशेष प्रकार आहे. Omicron बद्दल फारशी माहिती नाही. तो किती प्रमाणात संसर्गजन्य आहे. तो लसवर मात करु शकेल का?


सौदी अरेबियातही Omicron 


Omicronने सौदी अरेबियातही शिरकाव केला आहे. आखाती देशात अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. Omicronची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्ती काही दिवसांपूर्वी उत्तर आफ्रिकेतून परत आल्याचे सांगण्यात येत आहे. संक्रमित व्यक्ती देखरेखीखाली ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.