मुंबई : कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट हवेतून पसरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हाँगकाँग विद्यापीठानं याबाबत एक सर्वेक्षण केलंय. त्यातील निष्कर्षानुसार हा दावा करण्यात आला आहे. हाँगकाँगच्या एका क्वारंटाईन हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. (Omicron variant airborne spread  in Hong Kong says study)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इमर्जन्सी इन्फेक्शियस डिसीज' या नावानं हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलंय. केवळ अल्प काळासाठी खोल्यांचे दरवाजे उघडले जातात, तरी देखील हॉटेलमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झालाय. त्यामुळे त्याचं प्रसारण हवेतून होत नाही ना, अशी शंका यात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळेच त्याचा प्रसाराचा वेग अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.   



संशोधनातून नेमकं काय समोर आलं?  


संशोधनानुसार, हाँगकाँगमधील एका क्वारंटाईन हॉटेलमध्ये 2 जण थांबले होते. या दोघांमुळे हॉटेलच्या कॉरिडोरमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला. विशेष म्हणजे या दोन्ही व्यक्तींनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले होते.


तसेच हॉटेलमध्ये असताना हे दोघे कोणाच्या संपर्कात आले नव्हते. इतकंच नाही तर हे दोघेही घराबाहेरही पडले नव्हते. या दोघांच्या रुमचे दरवाजे हे केवळ कोरोना चाचणीसाठी आणि जेवण देण्यासाठीच उघडण्यात यायचे.  


इतकी सर्व खबरदारी घेतल्यानंतरही या दोघांना कोरोना झाला. तसेच हवेत हा विषाणू पसरला. यामुळेच हा व्हायरस हवेतून पसरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.