या देशात व्हॅक्सिन घेतलेल्यांपैकी फक्त १ टक्के लोकांनाच कोरोना
कोरोना व्हायरस सोबत लढण्यासाठी जगभरातील लोकं लस घेत आहेत. परंतु काही लोकांच्या मनात लसीबद्दल संभ्रम आहे, म्हणूनच ते लोकं लस घेणे टाळतात.
इंग्लंड : कोरोना व्हायरस सोबत लढण्यासाठी जगभरातील लोकं लस घेत आहेत. परंतु काही लोकांच्या मनात लसीबद्दल संभ्रम आहे, म्हणूनच ते लोकं लस घेणे टाळतात. परंतु ब्रिटनमधून लसीबद्दल अशी एक आनंददायी बातमी समोर आली आहे की, लोकांनी ते ऐकल्यानंतर त्यांना लस घेण्यासाठी प्रेरणा मिळेल.
ब्रिटनच्या ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाला लागण झाल्यामुळे खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागेल.
सेज पब्लिकेशन्सच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, व्हायरसच्या दुसऱ्या लाटे दरम्यान लसीकरण झालेल्यांपैकी केवळ एक टक्केच लोकांना रूग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता पडली. लसीकरणानंतर तीन आठवड्यांपर्यंत, त्यांच्या शरीरात ऍन्टीबाँडीज तयार झाले. अभ्यासानुसार, लसीचा पहिला डोस घेतल्याच्या तीन किंवा अधिक आठवड्यांनंतर, 52 हजारांपैकी 526 लोकांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले.
रुग्णालयात दाखल झालेले बहुतेक लोक वृद्ध
रुग्णालयात दाखल केलेल्या सर्व 526 लोकांना त्यांच्या शरीरात लसीकरणानंतर ऍन्टीबाँडीज मिळू लागले. त्याच वेळी, प्रथम डोस घेतल्यानंतर, कोणत्याही वेळी संसर्ग झालेल्या आणि रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या 29 टक्के इतकी होती. दुसरीकडे, 71 टक्के लोकं ते होते ज्यांच्या शरीरात लस घेतल्यानंतर ऍन्टीबाँडीज बनण्यापूर्वीच ते आजारी पडले. सेझ सल्लागारांनी सांगितले की, हे सर्व रूग्ण म्हातारे आणि गंभीर अवस्थेतील आहेत. या वयोगटावर या लसीचा परिणाम कमी होण्याची शक्यता आधीच होती.
लसीचा एक डोस देखील विषाणूंविरूद्ध प्रभावी
सेझचे सदस्य आणि युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल विषाणूशास्त्रज्ञ प्रोफेसर कॅलम सेम्पल म्हणाले की, "डेटावरून असे सूचित होते की, लसीचा एक डोस देखील जगातील लोकांचे संरक्षण करत आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहे, परंतु लस घेतल्यानंतर दुसर्या आणि तिसर्या आठवड्यानंतर हा दर झपाट्याने खाली आला आहे.