Viral Brain Teasers: सोशल मीडियावर रोज हजारो ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. त्यातील आव्हान घेऊन सोडवणं म्हणजे बुद्धीचा कस लागतो. अनेकदा फोटोतील वस्तू शोधताना डोकं भनभनून जातं. काही जण दिलेलं चॅलेंज मधेच सोडून जातात. पण काही जण ऑप्टिकल इल्यूजन सोडवून सुटकेचा निश्वास घेतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोत एक शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत गणित शिकवताना दिसत आहेत. पण चष्मा हरवल्याने त्यांना शिकवणं कठीण जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्गात कल्ला केल्याचं दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांचा चष्मा शोधण्यासाठी 10 सेकंदाचा अवधी दिला आहे. तर मग तुमच्या मोबाईलमध्ये 10 सेकंदाचं टाइम सेट करून शोध घ्यायला सुरुवात करा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमची तीक्ष्ण नजर संपूर्ण वर्गावर फिरवा आणि चष्मा नेमका कुठे आहे ते पाहा. वर्गातील प्रत्येक कोपरा न् कोपरा तपासून घ्या. नेमका चष्मा कुठे आहे या शोध ग्या. कारण तुम्ही चष्मा शोधला तर शिक्षकाचं टेन्शन दूर होणार आहे. त्यांना चष्मा नव्यानं बनवण्याची चिंता सतावत आहे. जर तुम्ही चष्मा शोधून दिला तर त्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे पैसे वाचतील. हरवलेला चष्मा शोधण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत तुम्ही करा. जर तुम्हाला बरोबर उत्तर मिळत नसेल, तर काही फरक पडत नाही, खालील फोटोमध्ये योग्य उत्तर पाहा.



चष्मा फ्लोअरवर पडलेला आहे. शिक्षकाच्या उजव्या बाजूला असलेल्या विद्यार्थ्यांच्या रांगेत पाहा. तिथे ज्या मुलाने कागदाचं विमान उडवलं त्या मुलांच्या बाकाखाली पाहा. आता सापडला ना चष्मा...चला तर मग आता हे चॅलेंज इतरांना द्या.