मुंबई : आपण जेव्हा एखादं चित्र किंवा फोटो पाहतो तेव्हा त्यावर आपली नजर खिळून राहते. फोटो किंवा चित्रात नेमकं काय आहे? याबाबत उत्सुकता असते. रंगसंगतीसोबत त्यामागच्या भावना शोधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. चित्रकलेत अनेक प्रकार आहेत. त्यापैकी ऑप्टिकल इल्युजन एक प्रकार आहे. या चित्रांमधून आपल्याला सहज उत्तर मिळणं कठीण होत. त्यामुळे अशी चित्र पाहताना आपण बांधलेला अंदाज आणि त्यामागे दडलेलं चित्र यात फरक जाणवतो. त्यामुळे अनेकदा ऑप्टिकल इल्युजन Optical Illusion चे अनेक चित्रं आपण पाहतो. असंच एक ऑप्टिकल इल्युजन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतच एक ऑप्टिकल इल्युजन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्युजनमध्ये एका माणसांनी भरलेल्या खोलीत एक भूत लपलंय. या ऑप्टिकल इल्युजनमध्ये असलेलं भूत तुम्हाला शोधायचं आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त 1% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.


या इतक्या माणसांनी भरलेल्या खोलीत भूतही आहे. हे भूत शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत. कोडं सोडवण्यापूर्वी, तुमच्या मोबाइल फोनमध्ये 10 सेकंदांचा टायमर सेट करण्यास विसरू नका. तुम्ही हा फोटो सतत काळजीपूर्वक पाहिल्यास तुम्हाला नक्की बरोबर उत्तर मिळेल.



तरीही तुम्हाला योग्य उत्तर मिळत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी एक हिंट आहे. फोटोच्या डाव्या बाजूला हे भूत आहे. तुम्ही तुमच्या उत्तराचा अंदाज लावला असेल. चला तर जाणून घेऊया त्याचं योग्य उत्तर...फोटोमध्ये दिसणारी ही व्यक्ती भूत आहे, कारण इतरांप्रमाणे त्या व्यक्तीची सावली मागील आरशात दिसत नाही.