Optical Illusion: सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे फोटोज हे व्हायरल (Social Media Viral Post) होत असतात. त्यातून त्यात काही ऑप्टिकल इल्यूजनही व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोत एक कुत्रा (Hidden Dog in Photo) लपलेला आहे. अनेक ऑप्टिकल इल्यूजन हे आपल्या डोळ्याची परीक्षा पाहात सध्या हा फोटोही पाहून तुम्हाला तुमच्या बुद्धीची आणि डोळ्यांची परीक्षा द्यावी लागणार आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की बेडरूम आहे. त्या बेडरूममध्ये एक कुत्रा लपलेला आहे. प्रथमदर्शनी कदाचित तुम्हाला हा कुत्रा दिसणार नाही पण जरा डोकं लावलंत तर तुम्हाला नक्कीच हा कुत्रा सापडू शकेल. (optical illusion try to find out the hidden dog in the photo) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्यात चांगले ऑब्झर्व्हेशन स्किल्स (Observation) असतील तर तुम्ही या फोटोतला लपलेला कुत्रा नक्कीच शोधून काढू शकता. तुमच्या समोर आव्हानं असतं की तुम्हाला ठराविक पण कमी कालावधीमध्ये त्यातील लपलेलं कोडं शोधायचं असतं. त्यामुळे या फोटोसाठी तुम्हाला काही सेकंदातच या फोटोत लपलेला कुत्रा शोधून काढायचा आहे. 


काही हुशार लोकांनी या फोटोत लपलेला कुत्रा शोधून काढला आहे. तेही काही सेकंदात. तुम्ही या फोटोत पाहू शकता की ही बेडरूम फार विखूरली गेली आहे. या बेडरूममध्ये चादरही नीट ठेवलेली नाही. बेडरूममध्ये वस्तूही इथे तिथे पसरल्या आहेत. त्यामुळे अशा पसऱ्यात आपण आता हा लपलेला कुत्रा कुठे शोधणार असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. परंतु या फोटोची (Try to find the Dog) गंमतच ती आहे ती पहिल्यांदा पाहिल्यावर या फोटोत कुत्रा कुठेच सापडणार नाही. त्यातून बेडवर चादरीसह उशीही अस्ताव्यस्त पडून आहे. या सगळ्यात तो कुत्रा काही दिसत नाही पण जर तुम्हाला हा कुत्रा सापडला तर तुमच्यापेक्षा हूशार दुसरं कोणी नाही.  


योग्य उत्तर काय जाणून घ्या


खरं तर या चित्रात हा कुत्रा बेडवरच बसला आहे. नीट पाहिलं तर चादरीच्या पुढच्या भागाच्या मध्यभागी कुत्र्याच्या चेहऱ्याचा थोडासा भाग बाहेर आलेला तुम्ही पाहू शकता. हा कुत्रा तिथेच झोपलेल्या अवस्थेत बसला आहे. तुम्ही जर का नीट पाहिलंत तर बेडच्या मध्यभागीच हा कुत्रा (Hidden inside the blanket) लपलेला आहे. तो चादरीच्या आत गुडूप झालेला आहे.