नवी दिल्ली : फ्रान्स सोबत झालेल्या राफेल डीलवर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्‍यारोप होत आहेत. या वादात आता भारताचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानने देखील उडी घेतली आहे. राफेल डीलवर फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांचं वक्तव्य आल्यानंतर पाकिस्तानने म्हटलं की, भारत सरकार या डीलमध्ये घेरली जात आहे. स्वत:चा बचाव करण्यासाठी भारत सरकार पाकिस्तानचं नाव मध्ये आणत असल्याचा आरोप पाकिस्तान करत आहे. पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी शनिवारी ट्विट करत यावर वक्तव्य केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी म्हटलं की, भारतात सत्ताधारी युद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्याला नाकरतो. सरकार पीएम नरेंद्र मोदींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. भारत-पाकिस्तानमध्ये दुश्मनी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. राफेल डीलवरुन पंतप्रधान मोदींवर राजीनामा देण्यासाठी दबाव बनवला जात आहे. भारत सरकार या डीलवरुन भारतीय जनतेचं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे.



फवाद चौधरी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे 2 ट्विटला रिट्विट करत म्हटलं आहे की, 'यावरुन हे कळतं की, भाजप पाकिस्तानविरोधात विष पेरत आहे. राफेल डीलवर त्यांनी स्वत: सामना करावा.'


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरोप केला होता की, राफेल डीलवर पंतप्रधानांनी देशाला धोका दिला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं की, 'पंतप्रधान यांनी बंद दरवाजाच्या मागे राफेल डीलवर चर्चा करुन बदल केला. फ्रांस्वा ओलांद यांचे धन्यवाद, आम्हाला माहित आहे की मोदींनी संकटात असलेल्या अनिल अंबानींसाठी अरबों डॉलर्सची डील केली. पंतप्रधानांनी देशाला फसवलं आहे. त्यांनी देशांच्या शहीद जवानांचा अपमान केला आहे.'