भेटवस्तू घोटाळाप्रकरणी इम्रान खान यांना अटक, पाकिस्तान न्यायालयाचा मोठा निर्णय
Imran Khan: तोशाखाना संदर्भ प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांना तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शनिवारी तोशाखाना प्रकरणात पाकिस्तान न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
Imran Khan: तोशाखाना संदर्भ प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांना तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शनिवारी तोशाखाना प्रकरणात पाकिस्तान न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
तोशाखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासह माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. याचा अर्थ पुढील 5 वर्षांसाठी ते कोणतीही निवडणूक लढवू शकत नाहीत. शिक्षेतून हा सर्वात मोठा इम्रान खान यांना बसल्याचे म्हटले जात आहे.
3 वर्षे कारावास, एक लाख दंड
तोशाखाना प्रकरणात इम्रान खानला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास खान यांना 6 महिन्यांचा अतिरिक्त तुरुंगवास भोगावा लागेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. इस्लामाबाद पोलिसांना इम्रान खानचे अटक वॉरंट मिळाले आहे.
आयजी इस्लामाबाद यांना मिळाला आदेश
न्यायालयाचा निर्णय येताच इस्लामाबाद पोलीस-प्रशासनात धावपळ सुरु झाली आहे. तोशाखाना प्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर इम्रान यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश आयजी इस्लामाबाद यांना देण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण?
तोशाखाना म्हणजे खजिन्याचे घर असा अर्थ होता. तोशाखाना हा पाकिस्तानमधील एक सरकारी विभाग आहे. जिथे पाकिस्तानचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना दिलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात. येथील तोशाखाना 1974 मध्ये बांधण्यात आला आहे. महागड्या भेटवस्तू नेहमी या तोशाखाना विभागात ठेवल्या जातात. भेटवस्तूची किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर राष्ट्रपती किंवा पंतप्रधान ते सोबत ठेवू शकतात. एखाद्या अधिकाऱ्याला भेटवस्तू स्वीकारायची असेल तर त्याला विशिष्ट किंमत मोजावी लागते. हे मूल्य तोषखाना मूल्यमापन समिती ठरवते. 2018 मध्ये सत्तेत आल्यानंतर इम्रान यांनी त्यांचे मूल्य 50 टक्क्यांनी वाढवले होते.
2018 मध्ये इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. अरब देशांच्या दौऱ्यांमध्ये त्यांना तेथील राज्यकर्त्यांकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. पाकिस्तानमधील नियमांनुसार इतर देशांच्या प्रमुखांकडून किंवा प्रतिष्ठित व्यक्तींकडून मिळालेल्या भेटवस्तू तोशाखान्यात ठेवाव्या लागतात.
दुसरीकडे ऑगस्ट २०२२ मध्ये पाकिस्तानच्या सत्ताधारी आघाडीने निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली. यामध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चेअरमनने आपल्या मालमत्तेच्या घोषणेमध्ये तोशाखाना समाविष्ट केला नाही. मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती दिली नाही. त्याचा खुलासा केला नाही,असा ठपका इम्रान खान यांच्यावर ठेवण्यात आला होता.