इस्लामाबाद : बातमी पाकिस्तानातून. पाकिस्तानमध्ये महापुरानं थैमान घातलंय. पुरामुळे जनता बेहाल झाली असताना कंगाल सरकार मात्र केवळ परदेशी मदतीकडे डोळं लावून बसलंय. गरोदर महिला, लहान मुलांना पुराचा सर्वाधिक फटका बसतोय. या पुराची हादरवणारी दृष्यं समोर येतायत. (pakistan flood 2022 floods caused by monsoon rains in pakistan caused severe devastation)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानातील पुराचं हे भयावह दृष्य. बघता बघता हे घर पाण्यात असं वाहून गेलं. आता हे दृष्य बघा. पाण्याचा प्रवाह किती भयंकर आहे हे या दृश्यांमधून दिसतंय. या महापुरात जे समोर येईल  ते थेट वाहून जातंय. या महापुरानं पाकिस्तानची पार दयनीय अवस्था केलीय. 


हा पूर किती भयानक आहे, हे या छायाचित्रांमधून दिसतंय. पुर येण्याच्या आधी दिसणारी जमीन, शेती अन् घरं आता अशी पाण्याखाली गेली आहेत. एक तृतियांश पाकिस्तान सध्या पाण्याखाली आहे. 


पुरामुळे आतापर्यंत 2 हजारांवर बळी गेले असून यात लहान मुलांची संख्या 700च्या घरात आहे. तब्बल 3 कोटी 30 लाख नागरिकांना या पुरानं तडाखा दिलाय. पाकिस्तानातला सातपैकी एक जणाला या पुराचा तडाखा बसलाय. 


पुराचा सर्वाधिक फटका गरोदर महिलांना बसलाय. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड या संस्थेच्या आकडेवारीनुसार तब्बल साडेसहा लाख गरोदर महिलांना तातडीनं मदतीची गरज असून यापैकी 73 हजार महिलांची प्रसुती महिन्याभरावर आलीये. याच संस्थेनं पुरानंतर महिलांवरील अत्याचार वाढण्याची भीतीही आपल्या अहवालात व्यक्त केलीये.


या महापुरात मानवता जपणारी काही दृष्यंही समोर आली आहेत. बचाव पथकाच्या या जवानानं पुरात अडकलेल्या मांजरीला कसं वाचवलं बघा.


त्याच वेळी आपला जीव धोक्यात घालून पुराचं शब्दशः 'इन डेफ्थ रिपोर्टिंग' करणा-या पत्रकारांचे हे व्हिडिओदेखील चांगलेच व्हायरल होतायत.


पाकिस्तानच्या इतिहासात आतापर्यंतची ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. कंगाल सरकार आणि पुरामुळे जनता बेहाल अशी स्थिती आहे. संयुक्त राष्ट्र, अमेरिकेनं मदतीचा हात पुढे केला असला तरी तिथल्या सरकारची कार्यक्षमता बघता ही मदत नागरिकांपर्यंत कशी अन् किती पोहोचेल याची शंकाच आहे.