नवी दिल्ली :  भारत पाकिस्तान दरम्यान तणावाचे संबंध कोणापासून लपून राहिलेले नाही. आता एक मोठा खुलासा याबाबत झाला आहे. २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशात वाढलेल्या तणावाच्या परिस्थितीत मुशर्रफ भारतावर अणूबॉम्ब हल्ला करण्याची योजना करत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा तणाव २००२ मध्ये आपल्या परमोच्च बिंदूवर पोहचला होता. त्यामुळे पाकिस्तान भारतावर अणूबॉम्ब हल्ला करू शकत होता. याच्या अनेक शक्यता होती. पण भारताने प्रत्युतर दिले असते त्यामुळे घाबरून हा निर्णय मुशर्रफ यांनी टाळला असल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 


या काळात मुशर्रफ अनेक रात्री झोपू शकले नाही, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जपानचे दैनिक मॅनिची शिम्बुन' नुसार  मुशर्रफ यांनी यावेळी स्वतःला प्रश्न केला होता की अणूबॉम्बचा हल्ला करावा की नाही. मुशर्रफ यांनी कधीच अमान्य केले नाही की माझा भारतावर अणूहल्ला करण्याचा विचार नव्हता.