नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ एका दुर्धर आजाराचे शिकार झाले आहेत. या आजारामुळे त्यांचे चालणे-फिरणे एवढंच नव्हे तर उभे राहणेही कठीण झाले आहे. सध्या लंडनमध्ये राहून ते आपल्या आजारावर इलाज करत आहेत. गेल्या शनिवारी पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींच्या आजारा बद्दल माहीती समोर आली. त्यांची स्थिती इतकी खराब झाली की त्यांना अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले. मुशर्रफ यांना एमाइलॉइडोसिसचे रिअॅक्शन झाले असून हा खूप दुर्धर असा आजार असल्याचे ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग ( APML)चे अध्यक्ष अफजल सिद्दीकी यांनी सांगितले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्याचेही ते म्हणाले. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण आराम करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मुशर्रफ या आजाराने पीडित होते. त्यावेळी लंडनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते अशी माहितीही सिद्दीकी यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एमाइलॉयडोसिसमुळे तुटलेले प्रोटीन शरीरात विभिन्न ठिकाणी जमा होतात. यामुळे परवेज यांना चालणे आणि उभे राहण्यास त्रास होत असल्याचेही ते म्हणाले. पुढचे पाच ते सहा महीने मुशर्रफ यांच्यावर इलाज सुरू राहू शकतो. ते पूर्णपणे बरे झाल्यावर पाकिस्तानात परततील अशी माहिती देण्यात येत आहे. 



मुशर्रफ यांना दोषी ठरवत त्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यावेळी ते पाकिस्तान सोडून दुबईला गेले होते. तेव्हापासून ते परतले नव्हते. असामान्य प्रोटीन शरीरात बनल्याने हा आजार होतो. हा प्रोटीन बॉन मैरोमध्ये तयार होऊ शरीराच्या कोणत्याही भागात जमा होतो. यामुळे हृदय, पचन क्रियेवर परिणाम होतो.