पाकिस्तानने स्वातंत्र्य दिनाच्या आधी भारतीय मच्छिमारांची केली सूटका
पाकिस्तानकडून 30 भारतीयांची सूटका
नवी दिल्ली : पाकिस्तानने आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवसाआधी 27 मच्छिमारांसह 30 भारतीयांची सूटका केली आहे. पाकिस्तानच्या जेलमधून आज 30 जणांना सोडण्यात आलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी म्हटलं की, या कैद्यांची सुटका राजकीय मुद्दयावर केली नसून माणवी हक्काच्या मुद्द्यावर करण्यात आली आहे.
प्रवक्त्यांनी म्हटलं की, हा 14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वतंत्र्यता दिवसाचा मानवीय भाव आहे. आम्हाला आशा आहे की भारत देखील अशा प्रकारेच व्यवहार करेल. एका सरकारी रिपोर्टनुसार 418 मच्छिमारसह 470 भारतीय पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत.
रविवारी पाकिस्तानच्या समुद्र सीमेत गेल्यामुळे भारतीय मच्छिमारांना अटक केल्याची बातमी देखील आली होती. मच्छिमारांना वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवलं जाईल.