इस्लामाबाद : भारतीय वायुदलाकडून पाकिस्तान हद्दीत बालाकोट येथे करण्यात आलेल्या कारवाईचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने भारतीय सिनेमा आणि जाहिरातींवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात बॉलिवूड सिनेमा चित्रपट रसिकांना पाहता येणार नाही. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान संतप्त झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानात सिनेमा आणि जाहिरातींवर  निर्बंध आणले आहेत. पाकिस्तानातील सिनेमा एक्झिबिटर्स असोसिएशनच्यावतीने भारतीय सिनेमांवर बंदी घालण्यात आली आहे, असे माहिती पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी जाहीर केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने पाकिस्तान हद्दीत थेट घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्थ केले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात भारताचे ४० सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. पाकिस्तानस्थित जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने हा हल्ला घडवून आणला. त्यामुळे पाकिस्तानला जोरदार हादरा बसला आहे.



हवाई हल्ल्यानंतर चिडलेल्या पाकिस्तानला काहीही करता येत नसल्याने त्यांनी आपला मोर्चा भारतीय सिनेमा आणि जाहिरातींकडे वळवला आहे. पाकिस्तानात सिनेमा आणि जाहिरातील प्रदर्शित करण्यास निर्बंध आणले आहेत. मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी म्हटलेय, पाकिस्तानातील सिनेमा एक्झिबिटर्स असोसिएशनच्यावतीने भारतीय सिनेमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाहीत. त्याचबरोबर भारतात निर्मित झालेल्या जाहीरातींवरही बंदी घालण्यात यावी, अशा सूचना पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलॅटरी अथॉरिटीला (पीईएमआरए) देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणालेत.


भारताने बालाकोट येथील ‘जैश’च्या तळांवर बॉम्ब हल्ले केले. यामध्ये सुमारे ३०० दहशतवादी मारले गेले. पुलवामा हल्ल्याचे उत्तर दिले. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात संपूर्ण दहशतवादी तळच उध्वस्त झाला. भारताकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानला खडबडून जाग आली. या बैठकीनंतर पाकिस्तनचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला या हल्ल्याचे उत्तर देणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भारताकडूनही सर्तक राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.